Ajit Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. पुढच्या आठवड्यात २० नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवारही रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार आहेत. तसंच तिसरी आघाडीही स्थापन झाली आहे. अशात बिगर मराठा मतं महायुतीला एकगठ्ठा मिळतील का? यावर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांना भाजपाने यापूर्वी यशस्वीपणे राबविलेल्या माधव (माळी, धनगर, वंजारी) फॉर्म्युलाबाबत विचारण्यात आले. यावर अजित पवार यांनी म्हटले की, “माधव फॉर्म्युला हा त्यावेळी यशस्वी ठरला होता. तेव्हा भाजपामध्ये गोपीनाथ मुंडे, ना.स. फरांदे आणि अण्णा डांगे यांच्यासारखे दिग्गज ओबीसी नेते होते. माधव फॉर्म्युलामुळे सर्वाधिक धुव्रीकरण हे वंजारी समाजात झाले होते. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या एका आदेशावर निवडणुकीचा निकाल बदलायचा. परंतु, आता तसे घडताना दिसत नाही. कारण आता विशिष्ट समाजाचे मतदार एका मर्यादेपर्यंतच विशिष्ट नेत्यांना पाठिंबा देताना दिसतात. वंजारी समाजात आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रुपाने नवीन नेतृत्व दिसत आहे”, असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हे पण वाचा- Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”

बिगर मराठा मतं मिळतील का?

राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष जमिनीवर जातीय ध्रुवीकरण होईल, असं मला वाटत नाही, असं परखड मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रात जातीय आधारावर मतदान झाल्यास बिगरमराठा मते महायुतीला मिळतील का? यावर अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार यांनी म्हणाले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या विचारधारेचा आहे, ही विचारसरणी महाराष्ट्रात घट्ट रुजली आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये जी राजकीय समीकरणे प्रभावी ठरतात ती महाराष्ट्रात चालणार नाहीत. ओबीसींची मतं एकगठ्ठा मिळतील का यावर अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी एक प्रकारे नकारार्थी उत्तर दिलं आहे.

मनोज जरांगेंबाबत काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतही भाष्य केलं आहे. मनोज जरांगे यांनी काही उमेदवारांना पराभूत करण्याच आवाहन केले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा हक्क असतो. त्यामुळे जनताच काय तो निर्णय घेईल. महाराष्ट्राने आजपर्यंत जातीच्या आधारावर मतदान करणं टाळलं आहे, असंही अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सांगितलं आहे.

शरद पवारांविषयी काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी या मुलाखतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली. या निवडणुकीत महायुतीला १७५ जागा मिळतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. तसंच बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीला मतदारांनी पवारसाहेबांना प्राधान्य देऊन सुप्रिया सुळे विजयी केलं. त्याप्रमाणे विधानसभेला बारामतीमध्ये माझा विजय होईल, असे अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

Story img Loader