Ajit Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या अनुषंगाने अजित पवार यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी शरद पवारांवर भाष्य केलं आहे. तसंच बारामतीत काय होईल ते देखील सांगितलं आहे. अजित पवार म्हणाले, माझा अभिमन्यू वगैरे झाला आहे असं मला वाटत नाही. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस होते. त्यांचं वर्चस्व महाराष्ट्र सरकारवर होतं. त्या काळात भाजपाने खूप मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक लोक तिकडे घेतले. लोकांना वाटत होतं की २० वर्षे तरी भाजपात सत्तेत राहणार. मात्र निवडणूक जवळ आली की अशा गोष्टी घडतात. तिकिट मिळालं तर पक्ष चांगला नाही मिळालं तर काही बरोबर नाही अशा गोष्टी घडतात असं उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

माझ्या पक्षातून जे सोडून गेले त्यांच्या जाण्याची सल नाही

What Ajit Pawar Said About MVA and Balasaheb Thackeray?
Ajit Pawar : अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत, “बाळासाहेब ठाकरे हयात असते तर महाविकास आघाडी..”
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Raj Thackeray appeal to the voters regarding voting in the meeting in Mangalvedha
निवडून आलेले तुमचे गुलाम, तुम्ही गुलाम होऊ नका; मंगळवेढ्यातील सभेत राज ठाकरेंचे आवाहन
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

कुणाच्याही जाण्याची सल नाही. माझ्याबरोबर बहुतांश आमदार आल्याने आपल्याला त्यांनाच तिकिट द्यावं लागेल. फार काही बदल करता येणार नाहीत हे मला माहीत होतं. त्यामुळे कुणी पक्ष सोडून गेलं तरीही माझ्या मनात कसलीही सल वगैरे नाही. लोकसभेला जे काही झालं ते झालं. त्यानंतर आम्ही चांगल्या योजना आणल्या आहेत. मात्र आमचे विरोधक खोटं बोलत आहेत. एकीकडे सांगत आहात महायुतीच्या योजना राज्याच्या विकासाला खिळ घालणाऱ्या आणि आर्थिक संकटात पाडणाऱ्या आहेत असं विरोधक म्हणत आहेत. मात्र भाषणांत याच योजनांचे पैसे वाढवू म्हणतात. त्या गोष्टींना फार काही महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. लाडकी बहीण योजना आणली तेव्हा ती बंद पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसने आणि इतर विरोधकांनी केला. कोर्टात गेले, पण त्याचा काही फारसा उपयोग झालेला नाही. असंही अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले. अजित पवार यांनी News 18 लोकमतला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत अजित पवारांनी ( Ajit Pawar ) ही उत्तरं दिली आहे.

हे पण वाचा- Ajit Pawar : “मी बारामतीतून निवडणूक लढणार नव्हतो, पण…”, अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “मी नौटंकी…”

बारामतीत निवडणुकीचा मूड काय?

माझ्या बारामतीत माझ्यासाठी मला मूड चांगला दिसतो आहे. बारामतीकर मतदान करतील. मतांची टक्केवारी किती होते त्यावरुन पुढचं चित्र सांगता येईल. मी सातवेळा आमदारकीची निवडणूक आजवर लढवली आहे. मी समोरच्या उमेदवाराला कमी लेखत नाही. मी समोरचाही आपल्या तुल्यबळाचाच उमेदवार आहे असं समजूनच मी निवडणूक लढवतो असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

शरद पवार राजकारणातून निवृत्त होतील का?

शरद पवार राजकारणातून निवृत्त होतील का? हे विचारलं असता अजित पवार म्हणाले, “मी याबद्दल खूप मोठी किंमत चुकवली आहे. मला सगळ्या महाराष्ट्राने व्हिलन ठरवलं. असाच एक प्रसंग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी झाला होता. त्यावेळी निवृत्ती जाहीर केल्यानंतर शरद पवारांनी तो निर्णय फिरवला. कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यामुळे त्यांनी तो निर्णय फिरवला. शरद पवारांच्या मनात काय हे आजपर्यंत कुठल्याच व्यक्तील कळलेलं नाही. मी घरातला आहे तरीही मला ते कळलेलं नाही. मला त्यांची निवडणुकीचं धोरणच कधी समजलं नाही. कारण २०१४ मध्ये पूर्ण निकाल येण्याआधीच राष्ट्रवादीने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर भाजपासह मंत्रिमंडळात जायचाही प्रसंग आला होता. शिवसेना चालत नाही असं तेव्हा सांगितलं. त्यानंतर २०१९ ला भाजपासह सगळी चर्चा झाली. त्यानंतर वरिष्ठांचे विचार बदलले. त्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं ठरवलं. त्यामुळे मी काय ते निवृत्त होतील का? या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही.” असं अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले आहेत.

Story img Loader