Ajit Pawar NCP Rally in Walva Assembly Constituency of Jayant Patil : “वरिष्ठ (शरद पवार) नेते म्हणाले, इथे (वाळवा मतदारसंघ/जयंत पाटील) मुख्यमंत्रिपद येणार, या त्यांच्या थापा आहेत, नुसत्या थापा…”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी वाळवा मतदारसंघात केलं आहे. अजित पवार यांनी येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी येथील विद्यमान आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार यांनी जयंत पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे संकेत दिले होते. त्यावरून अजित पवारांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. तसेच “लबाडाघरचं आवातनं जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही”, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना लबाड म्हटलं आहे.

शरद पवार म्हणाले होते, महाराष्ट्र सांभाळण्याची व पुढे नेण्याची शक्ती ज्या लोकांमध्ये आहे असे आपले सहकारी जयंत पाटील आगामी काळात महत्त्वाची जबाबदारी सांभाळू शकतात. यावर अजित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, “इथे मुख्यमंत्रिपद येणार या नुसत्या थापा आहेत, लबाडाघरंच आवातनं जेवल्याशिवाय खरं नाही. हे सगळं खोटं आहे, असं काही होणार नाही”.

हे ही वाचा >> “एकदा गृहमंत्रिपद द्या, असं मी वरिष्ठांना सांगायचो, पण…”, अजित पवारांचं वक्तव्य; आर. आर. पाटलांचा उल्लेख करत म्हणाले…

अजित पवारांची जयंत पाटलांवर टीका

अजित पवारांच्या या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी आज प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आम्ही टप्प्यात आल्यावर लगेच कार्यक्रम करतो. उद्या, परवा नाही तर आजच कार्यक्रम करू”. जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, “आम्ही कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही. करेक्ट कार्यक्रम केल्याने माझ्या माय माऊलींना पैसे मिळणार नाहीत. इथल्या तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळणार नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार नाही. मुळात करेक्ट कार्यक्रम करणं माझ्या हातात नाही आणि त्यांच्याही हातात नाही. कोणाच्याच हातात नाही”.

हे ही वाचा >> Ajit Pawar on RR Patil: ‘पैज हरल्यामुळं आर. आर. पाटलांना द्यावी लागली होती आलिशान गाडी’, अजित पवारांनी सांगितला किस्सा

अजित पवारांची आर. आर. पाटलांवर टीका

दरम्यान, अजित पवारांनी तासगावातही आज एक सभा घेतली. या सभेतून त्यांनी त्यांच्या पक्षाचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “आता मी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी खाली उतरलो. तिथे समोरच मला तुमचं (तासगाव) बसस्थानक दिसलं. तुमच्या बसस्थानकाची वाईट अवस्था आहे. कधीतरी येऊन माझं (बारामती) बसस्थानक बघा आणि तुमचं बस स्थानक बघून तुलना करा. विकास करण्यासाठी तिथल्या नेतृत्त्वात धमक आणि ताकद असावी लागते. नुसती भाषणं करून काही होत नाही, तुमची पोटं भरणार नाहीत. भाषणं करून इथल्या मुला-मुलींना रोजगार मिळणार नाही. तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त काळ गृहमंत्रिपद कोणाकडे होतं? आर. आर. पाटील यांच्याकडे सर्वाधिक काळ गृहमंत्रिपद होतं”.

Story img Loader