आज ( १ मे ) ६३ वा महाराष्ट्र दिन आहे. १ मे १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. हा दिवस मराठी माणूस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. शिवाय या दिवशी कामगार दिनही साजरा करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या वीरांना अजित पवारांनी अभिवादन केलं आहे.

ट्वीट करत अजित पवार म्हणाले की, “राज्यातील जनतेला ‘महाराष्ट्र दिना’च्या मनापासून शुभेच्छा देतो. यासह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या १०६ वीरांना अभिवादन करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात योगदान देणाऱ्या समस्त महाराष्ट्र वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.”

Who Ask Question to Sharad Pawar?
“अजित पवारांच्या लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची?”, शरद पवारांना कुणी विचारला प्रश्न?
Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about Imbalance of development in vidarbha
मुद्दा महाराष्ट्राचा : विदर्भ- असमतोलाची अस्वस्थता…

हेही वाचा : Video : “जे मी जगात पाहिलंय…”, महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “अख्ख्या जगाला…”

“संपूर्ण जगाची चाकं कामगारांच्या श्रमशक्तीवरच फिरत असतात. कामगारांच्या घामावरच जगाचा रहाटगाडा सुरु असतो. कामगार दिनाच्या निमित्तानं जगभरातील कामगारांना, त्यांच्या श्रमशक्तीला वंदन करतो. कामगार बंधु-भगिनींना, त्यांच्या कुटुंबियांना आजच्या कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो,” असं अजित पवार यांनी म्हटलं.

“आजचा महाराष्ट्र दिन साजरा करत असताना बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह सीमाभागातली मराठी भाषक ८१४ गावं महाराष्ट्रात सामील करण्याचं आपलं स्वप्न आजही अपूर्ण आहे. ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचा आपला लढा कायम राहील,” असा निर्धारही अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

“शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, आरोग्य, कला, क्रीडा, सहकार अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच अव्वल राहिली आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक सुधारणा अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्रानं पहिला क्रमांक कायम ठेवला आहे,” अशी भावना अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

“महाराष्ट्र खऱ्या अर्थानं ज्यांच्या विचारांवर चालतो, ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनाही वंदन करतो,” असं अजित पवारांनी म्हटलं.

हेही वाचा : विश्लेषण: हुतात्मा स्मारकावर साम्यवादी प्रभावामागचे कारण काय?

“महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या शेतकरी, कष्टकरी, साहित्यिक, कलावंत, खेळाडू, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेकांच्या कष्टातून महाराष्ट्र घडला, वाढला, समृद्ध झाला आहे. महाराष्ट्राच्या या सुपुत्रांबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेद विसरुन विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊया. देशाची एकता, समता, बंधुता, सार्वभौमत्वाची भावना कायम ठेवूया. देशाची लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची शपथ घेऊया,” असं आवाहनही अजित पवारांनी केलं आहे.