Ajit Pawar Dies in Baramati Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. बारामतीजवळ ही दुर्घटना घडली. विमान लँडिंग करताना खाली कोसळलं आणि त्यात स्फोट झाला. या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचं निधन झालं. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांची नावे समोर आली आहेत.

अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीला आले होते. घटनास्थळावरील जे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत, त्यात विमान जळून खाक झाल्याचं दिसतंय. विमान उतरत असताना एका शेतात कोसळले आणि स्फोट झाला आणि विमानातील सर्वांचे निधन झाले.

विमान अपघातातील मृतांची नावे

अजित पवार खासगी VSR कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. विमानात एकूण पाच जण होते, अशी माहिती समोर आली आहे. मुंबईतून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमानाने टेकऑफ केले होते आणि बारामतीत ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होणार होते, पण त्यापूर्वीच विमानाचा अपघात झाला.

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अधिकारी विदिप जाधव, पिंकी माळी आणि कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे.

  1. अजित पवार
  2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव
  3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
  4. कॅप्टन संभवी पाठक
  5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. युगेंद्र पवार व रोहित पवार रुग्णालयात पोहोचले आहेत. तर शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार व पार्थ पवार हे दिल्लीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच सर्वजण दिल्लीहून बारामतीसाठी रवाना झाले आहेत.