Maharashtra Deputy CM and NCP Leader : राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री असलेल्या अजित पवारांचे काल (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. आज (२९ जानेवारी) त्यांच्यावर बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अजित पवार यांचे काका आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवारांच्या अनाकलनीय वृत्तामुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील बारामती तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा या गावात बुधवारी सकाळी अजित पवारांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केले. मात्र, सकाळी पावणेनऊच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी आधीच कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माली यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली.
अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली. प्रशासनावर पकड असलेला, जनतेच्या प्रश्नांवर सदैव काम करत राहणारा आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व असलेला नेता अकाली काळाच्या पडद्याआड गेल्याच्या धक्क्याने सारेच हादरले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशभरातील नेतेमंडळींनी अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेते आणि कार्यकर्त्यांमधून तर बुधवारी आकाश कोसळल्याची भावना व्यक्त होत होती. पक्षाच्या नेत्यांना अश्रू अनावर होत होते तर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी शोकमग्न अवस्थेत बारामतीकडे धाव घेतली.
Ajit Pawar Last Rites Funeral Live Today : अजित पवार अनंतात विलीन, जनसागराला अश्रू अनावर
जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणूक पुढे ढकलली...
Ajit Pawar Death Update : अजित पवारांविषयी विकिपीडियावर असलेली माहिती खोटी, प्रशासनाने दिली माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होण्याच्या २१ तास आधीच विकिपीडियाने अजित पवार यांच्या पेजवर त्यांच्या मृत्यूची तारीख अपडेट केली होती. त्यामुळे, ही दुर्घटना घडवून आणल्याचा संशय निर्माण होतो, अशा आशयाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले दावे खोटे आहेत.
"नियती इतकी क्रूर कशी असू शकते?", धनंजय मुंडेंनी दादांना दिला अखेरचा दंडवत
तुमच्या धनंजयचा अखेरचा दंडवत दादा... महाराष्ट्राचा दादा माणूस आज अनंतात विलिन होताना अत्यंत जड अंतःकरणाने आदरांजली अर्पण केली. दादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही... तुमच्याविना पोरके, अपुरे आणि अर्धवट आहोत. नियती इतकी क्रूर कशी असू शकते? भावपूर्ण आदरांजली दादा... - धनंजय मुंडे</p>
https://twitter.com/dhananjay_munde/status/2016840904611709368
पिंपरी- चिंचवड शहराचा शिल्पकार काळाच्या पडद्याआड; खासदार झालेल्या दादांनी कशी मने जिंकली!
चिखलीत सर्वपक्षीय कडकडीत बंद
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल अपघाती निधन झाले या निधनाची बातमी समजताच शोकाकुल वातावरण झाले होते. काल दुपारी सर्वपक्षाच्या वतीने चिखली बंदीची हाक देण्यात आली होती, या हाकेला प्रतिसाद देत आज व्यापारी बांधवांनी चिखली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. शहरात शांतता व शिस्तबद्ध वातावरण दिसून आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले यामुळे महायुतीच्या वतीने काल चिखली बंद करण्यासाठी आमदार श्वेता महाले आणि राष्ट्रवादीचे नेते शंतनु बोंद्रे यांनी सर्वपक्षीय बंदची हाक दिली होती सकाळपासून चिखलीत सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला व्यापाऱ्यांनी चिखली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र उघडी ठेवण्यात आली आहेत.
दादांना, 'आय लव्ह यू' सांग… म्हणत कार्यकर्त्याने फोडला टाहो
Ajit Pawar Funeral Live Updates : आदिती तटकरेंच्या अश्रूंचा बांध फुटला
दादा म्हणाले होते…. मी येणार आहे, वस्तू तशाच ठेवा!
Ajit pawar Death Updates : "महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली", अमित शाहांनी घेतली शरद पवारांची भेट
Video : अजितदादांच्या चप्पलेची घरात पूजा; ‘योद्धाच गेला, आता कसे लढणार?’ - सहा वर्षांपूर्वी भाड्याच्या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला….
संसद भवन परिसरात नितीन गडकरी व राहुल गांधींची भेट, काय झाली चर्चा?
Ajit Pawar Funeral Updates: अजित दादा अनंतात विलीन…
Ajit Pawar Last Rites Updates: राज्याच्या कानाकोपऱ्यातून दादांवर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्ते, नागरिकांनी बारामतीत गर्दी केली होती. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Ajit Pawar Funeral Live Updates : "संघर्ष आज संपला", अंजली दमानिया यांची पोस्ट
Ajit Pawar Death Politics: अजित पवार यांच्या अनपेक्षित जाण्याने, राजकीय गदारोळात अधिकच भर!
Ajit Pawar Funeral Live Updates : लासलगाव येथे शोकसभा; आस्थापना बंद ठेवत अजित पवारांना श्रद्धांजली
लासलगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकसभा आयोजित करण्यात आली यावेळी विविध सामाजिक, राजकीय संघटनांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शोक व्यक्त करण्यासाठी शहरातील व्यापारी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आस्थापने बंद ठेवली होती अजित पवार यांच्या कार्याचा उपस्थितांनी यावेळी गौरव करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
Ajit Pawar Funeral Live Updates
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. नितीन नबीन यांचे बारामती, पुणे येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रीगण उपस्थित होते.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/2016752982248083538
LIVE: महाराष्ट्राच्या विकासाभिमुख नेतृत्वाला अखेरचा निरोप..
Ajit Pawar Funeral Live Updates : सुनेत्रा पवारांनी घेतलं अजित पवारांचं शेवटचं दर्शन
पवार कुटुंबियांनी घेतलं अजित पवारांचं अखेरचं दर्शन
"अरे ही गाडी तर माझ्याकडे पण होती, चल तुझ्याच गाडीत बसतो…" युवा नेत्यास दादांचे सारथ्य करण्याची मिळाली संधी
Ajit Pawar Funeral Live Updates : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनंताच्या प्रवासाला सुरुवात
बारामती येथील विमान अपघातानंतर अजित पवार यांची २०२४ मधील एक जुनी सोशल मीडिया पोस्ट पुन्हा समोर आली आहे. महिला वैमानिकांच्या कौशल्याविषयी विश्वास व्यक्त करणाऱ्या या ट्विटचा सद्य अपघाताशी कोणताही थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. सविस्तर वाचा
Ajit Pawar Funeral Live Updates : जड अंतःकरण, डोळ्यांत अश्रू अन् सुप्रियाताईंचा हात; सुनेत्रा पवार विद्याप्रतिष्ठानमध्ये दाखल
सुनेत्रा पवार विद्याप्रतिष्ठान येथे पोहोचल्या असून जड अंतःकरणाने त्या दादांच्या पार्थिवाकडे निघाल्या होत्या. यावेळी त्यांच्या नणंद सप्रिया सुळे यांनी त्यांना सावरलं. त्यांचा हात घट्ट पकडून मी तुझ्या दुःखात सहभागी असल्याची जाणीव करून दिली.
Ajit Pawar Funeral Live Updates : राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट
राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
Ajit Pawar Funeral Live Updates : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बारामतीत दाखल
अजित पवारांना अखेरची मानवंदना देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत दाखल
Ajit Pawar death Live Updates : डीजीसीए आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल
अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी करण्याकरता डीजीसीए आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल
Ajit Pawar Funeral Updates: बारामती शहरात ठिकठिकाणी मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण
अजित दादांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मोकळ्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात ठिकठिकाणी मोठ्या पडद्यावर त्याचे प्रक्षेपण करण्यात येत आहे. दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी बारामतीत प्रचंड गर्दी झाली आहे.

अजित पवार अपघाती मृत्यू लाईव्ह अपडेस्ट (फोटो - Arul Horizon)
Ajit Pawar Last Rites Funeral Live Today : अजित पवार अनंतात विलीन, जनसागराला अश्रू अनावर

