चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करुन अपक्ष अर्ज सादर केला आहे. राहुल कलाटे यांच्या उमेदवारी अर्जाबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना विचारले असता, अजित पवार म्हणाले की, मी अजून राहुलला विचारलं नाही की तुला फूस कोणाची आहे? तुम्ही मला प्रश्न विचारल्यामुळे आता माझी आणि त्याची जेव्हा भेट होईल तेव्हा मी त्याला विचारेन का रे बाबा तुला नेमकी कोणाची फूस आहे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर पत्रकारांनी अजित पवार यांना विचारलं की, राहुल तुमचे ऐकणार का? त्यावर अजित पवार चांगलेच संतापले. “मी पत्रकारांचा आदर करतो. पण असले आलतूफालतू प्रश्न विचारणार असाल तर पुन्हा मी माध्यमांशी बोलणार नाही. मी काही साधासुधा कार्यकर्ता नाही. राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. माझ्या पक्षातला नेता आहे. उद्या कुणीही येरागबाळा काहिही बोलेल, त्यावर तुम्ही जर मला प्रश्न विचारणार असाल तर त्याला काही अर्थ नाही”, अशी जणू तंबीच अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.

अजित पवार म्हणाले की, गेली अनेक वर्ष मी राजकारणात आहे. राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे लोक मी जे बोलतो त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे अशा आलतुफालतू प्रश्नांना उत्तरं द्यायला मी काही बांधील नाही.

महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी

चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बरीच चर्चा आणि बैठकांनंतर नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. नाना काटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. परंतु या निर्णयामुळे नाराज झालेले राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

हे ही वाचा >> “…तर महाविकास आघाडी सरकार टिकलं असतं”; विजय वडेट्टीवारांचा नाना पटोलेंना घरचा आहेर

भाजपकडून चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी

पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांमधील आमदारांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपाने कसबा मतदारसंघातून हेमंत रासने आणि चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar gets angry on media while talking about rahul kalate chinchwad bypoll asc
First published on: 09-02-2023 at 13:30 IST