scorecardresearch

Premium

अजित पवार गटाकडून बुधवारी बैठकीचं आयोजन, सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

अजित पवार गटाकडून उद्या (बुधवार, ५ जुलै) मुंबईत बैठकीचं आयोजन केलं आहे.

ajit pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांसह त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदी तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडखोरीनंतर पक्षात दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून आता पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून उद्या (बुधवार, ५ जुलै) मुंबईत बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन अजित पवार गटाकडून करण्यात आलं आहे.

मुंबईतील एमईटी, भुजबळ नॉलेज सिटी येथे या बैठकीचं आयोजन केलं आहे. अजित पवार गटाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

Police suspended Wardha
वर्धा : ‘ते’ दोन पोलीस अंमलदार अखेर निलंबित, मद्यधुंद अवस्थेत कार चालवत…
Both employees of Kalyan Dombivli Municipality in police custody
कल्याण डोंबिवली पालिकेच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी
Ahmednagar lawyers gate Collector office
नगरमध्ये मोर्चेकरी वकील चढले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर; फेकल्या पाण्याच्या बाटल्या!
Dhule police criminals enquiry law loksabha elections
धुळ्यात गुन्हेगारांनी घेतली ही शपथ

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आजी-माजी आमदार -खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असं आवाहन अजित पवार गटाकडून करण्यात आलं आहे. या बैठकीत नेमका कोणता निर्णय होणार? अजित पवार गटाची पुढची रणनीती काय असेल? याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर बंडखोरीचं चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar group organizes meeting on wednesday appeals to all leaders and office bearers to attend rmm

First published on: 04-07-2023 at 22:12 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×