Ajit Pawar on Baramati Assembly Election: महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राज्यात निवडणुका नेमक्या कधी होणार? याची उत्सुकता मतदारांप्रमाणेच राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनाही लागली आहे. जम्मू-काश्मीर व हरियाणाच्या निवडणुका आयोगानं आधी जाहीर केल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका दिवाळीआधी की दिवाळीनंतर? यासंदर्भात तर्क-वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यभर मतदारांशी संवाद साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये पक्षकार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत सूचक विधान केलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून तिकीट देण्यात आलं होतं. मात्र, सुप्रिया सुळेंसमोर त्यांचा पराभव झाला. खुद्द अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळालं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांवर याचा परिणाम होणार असे अंदाज वर्तवले जात होते. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगितल्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं. त्याचसंदर्भात अजित पवारांनी आज बारामतीमध्ये बोलताना भाष्य केलं.

ajit pawar confession
Ajit Pawar : “कुटुंबातील फूट समाज स्वीकारत नाही, मलाही याचा अनुभव”, अजित पवारांची कबुली!
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sanjay raut criticise over Amit shah Lalbaugcha raja darshan
Sanjay Raut : “मुंबईतील उद्योग पळवले, आता लालबागचा राजा…”, अमित शाहांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचा आरोप
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांनी यावेळी लवकरच निवडणुकांची घोषणा होणार असल्याचे सूतोवाच केले. “मागचं सरकार २०१९ च्या निवडणुकीत २६ नोव्हेंबरला स्थापन झालं होतं. त्यामुळे नवीन सरकार २६ नोव्हेंबरच्या आत स्थापन झालं पाहिजे असा एक नियम आहे. निवडणूक आयोग कधी निवडणूक घेईल माहिती नाही. खूप जण निधीची मागणी करत आहेत. पण आता मी निधीसाठी फाईलवर रिमार्क काहीही दिला, तरी तो मंजूर होईपर्यंत आचारसंहिता लागेल. त्यामुळे सगळ्यांनी याचा विचार करावा”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

“मीही एक माणूस आहे”

“बारामतीत आपण सर्वांगीण विकास केला. राज्यात सर्वाधिक निधी दिला. मीही एक माणूस आहे. मला कधीकधी विचार येतो की एवढी सगळी कामं करूनही बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात. आता मलाही राजकारणात ३३-३४ वर्षं झाली आहेत. मी तर आता दुसरा खासदार राज्यसभेवर पाठवू शकतो. त्याआधी संसदीय समितीनं सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी दिली होती. मध्ये राजेश विटेकरला आमदार केलं. शिवाजीराव गर्जेंना केलं. आता राज्यपाल नियुक्त आमदारांचं काय होतंय माहिती नाही. पण जर यंदाच्या निकालांसारखी गंमत होणार असेल तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणायचं”, अशी टिप्पणी अजित पवारांनी केली.

Ajit Pawar : “कुटुंबातील फूट समाज स्वीकारत नाही, मलाही याचा अनुभव”, अजित पवारांची कबुली!

“मी आता समाधानी आहे”

दरम्यान, आजपर्यंतच्या कारकि‍र्दीवर आपण समाधानी असलयाचं अजित पवार यावेळी म्हणाले. “आता मीही ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा. मग तुम्ही ९१ ते २०२४ च्या माझ्या कारकि‍र्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकि‍र्दीची तुलना करा”, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

“मी कधी वेगळी भूमिका घेतली नाही. तरी निवडणुकीच्या वेळी काय झालं तुम्ही बघा. काहीजण बेताल वक्तव्य करतात. पण अशा वक्तव्यांचं कधीच आम्ही समर्थन केलं नाही. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारानं एक विधान केलं त्याचाही आम्ही निषेधच केला. सगळ्यांना मतं मांडण्याचा अधिकार घटनेनं दिला आहे”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.