scorecardresearch

Premium

“जो बेंबीच्या देठापासून ओरडतो…”, अजित पवारांच्या टिप्पणीवर एकच हशा; शिबिरातील भाषणात टोलेबाजी!

भाषणाच्या मध्येच एक कार्यकर्ता मोठमोठ्याने घोषणा देऊ लागताच अजित पवारांनी त्याचीच फिरकी घेतली!

ajit pawar karjat speech marathi
अजित पवारांची टोलेबाजी, उपस्थितांमध्ये हशा! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कर्जतमध्ये झालेल्या अजित पवार गटाच्या शिबिरामध्ये अनेक नेतेमंडळींनी सविस्तर भाषणं केली. खुद्द अजित पवारांनीही सविस्तर भाषण करून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. राष्ट्रवादी पक्षफुटीवेळी नेमकं काय घडलं होतं, यावर त्यांनी भाष्य केलं. मात्र, यावेळी अजित पवारांनी त्यांच्या शैलीत केलेल्या टोलेबाजीमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. सच्चा कार्यकर्ता कसा ओळखावा यावर बोलतानाच त्यांनी कुटुंब नियोजनाबाबत केलेल्या विधानावरही उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटल्याचं पाहायला मिळालं!

“२० वर्षांनी भारत सर्वाधिक ज्येष्ठ वर्ग असणारा देश”

कुटुंब नियोजनाविषयी बोलताना अजित पवारांनी २० वर्षांनंतरच्या भारताविषयी मत व्यक्त केलं. “जगात आपल्या देशात सगळ्यात जास्त तरुण वर्ग आहे. २० वर्षांनी जेव्हा आपण १६० कोटींवर जाऊ. तेव्हा सगळ्यात ज्येष्ठ वर्ग असणारा देश भारत असेल. त्यामुळे पुढच्या पीढीसाठी आता काहीही करून एक किंवा दोन आपत्यांवर थांबलं पाहिजे. त्यासाठी कायदा करावा लागला तरी मोदींनी करावा. कुठल्याच जाती-धर्मानं, देवानं, अल्लाहनं सांगितलेलं नाही की कितीही पैदास करा. एक किंवा दोन अपत्यांवर आपण नाही थांबलो तर काही वर्षांनी देशात अशी स्थिती निर्माण होईल की पाणी प्यायला राहणार नाही. घरांची व्यवस्था करता येणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.

love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
sharad pawar and ajit pawar
‘मला एकटं पाडतील’, अजित पवारांच्या आरोपावर शरद पवारांचं थेट उत्तर; म्हणाले “आमच्या घरातील…”
woman committed suicide with her two-month-old baby connection with Postpartum depression
‘तिनं असं का केलं…?’
dalit organizations demonstrate power by march in akkalkot
अक्कलकोटमध्ये दलित संघटनांच्या मोर्च्यातून घडले शक्तिप्रदर्शन

“राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशाने झालं”, अजित पवारांचा खळबळजनक आरोप!

“दोन्ही मुली झाल्या तर वंशाचा दिवा म्हणून तिसरा मुलगा होईल असं करू नका. वंशाचा दिवा वगैरे काही नसतं. उलट मुलीच मुलांपेक्षा जास्त नाव काढतात असा काहींचा अनुभव आहे”, असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

“पुढं-पुढं करणारा असला की समजावं…”

दरम्यान, कार्यकर्त्यांना आपापल्या गावात, वॉर्डमध्ये, तालुक्यात कार्यक्षमतेनं काम करण्याचे निर्देश अजित पवारांनी यावेळी दिले. यावेळी एक कार्यकर्ता मोठमोठ्यानं घोषणा देत असताना अजित पवारांनी त्याचीच फिरकी घेतली.

“तुझा तालुका कुठला रे? तालुका सांग. त्याच्याकडे बुथ झालाय का, बुथ कमिटी झालीये का हे बघितलं पाहिजे. जो सर्वात जास्त बेंबीच्या देठापासून ओरडतो ना, त्याचं सगळं मागचं मोकळं असतं. काहीही काम नाही. पण आपल्या आवाजानं नेत्याला कळावं म्हणून ओरडत असतो. गाडीचा दरवाजा उघडतो, पुढेपुढे करतो. मग आपण समजावं, ज्याला गावात कुत्रंही विचारत नाही तो हा माणूस आहे. शप्पथ खोटं बोलत नाही”, असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये पुन्हा हशा पिकला!

“…म्हणून मला टार्गेट करण्यात आलं”, अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “माझ्यावरच्या आरोपांमुळे…!”

“आम्ही बरेच राष्ट्रीय नेते असतो. पण आमचं गावच आमचं नसतं. सरपंच कुणीतरी वेगळाच असतो. आपला वॉर्ड, आपला गाव आपल्याबरोबर असला पाहिजे. तर आपल्याला समाज मानतो. काही गोष्टी नाही पटल्या तरी त्या पटवून घ्याव्या लागतात”, असं अजित पवारांनी नमूद केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar mocks shouting party worker in ncp karjat shibir pmw

First published on: 01-12-2023 at 16:01 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×