scorecardresearch

Premium

“जयंत पाटलांनी प्रकाश सोळंकेंना प्रदेशाध्यक्षपदाचा शब्द दिला होता, पण…”, अजित पवारांचा गौप्यस्फोट

“कार्यकर्त्यांना नाराज करायचं, मला अजिबात आवडत नाही,” असंही अजित पवारांनी सांगितलं.

ajit pawar prakash solanke jayant patil
प्रकाश सोळंकेंच्या प्रदेशाध्यक्षपदावरून अजित पवारांनी केलेल्या टीकेला जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य केलं आहे. २०१९ साली ‘प्रदेशाध्यक्ष’ पदावरून जयंत पाटलांनी प्रकाश सोळंके यांना शब्द दिला होता. पण, तो शब्द जयंत पाटील यांनी पाळला नाही, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. तसेच, दहा वेळा विचार करून शब्द द्या, असंही अजित पवारांनी जयंत पाटलांना सुनावलं आहे.

रायगडमधील कर्जत येथे अजित पवार गटाचं वैचारिक मंथन शिबिर आयोजित केलं आहे. यावेळी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “मी प्रदेशाध्यक्ष झालो नसलो, तरी संघटनेचं काम कोण करत होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. मी विरोधी पक्षनेते पद सोडून संघटनेची जबाबदारी देण्याची मागणी केली होती. कुठलीही चुकीची गोष्ट केली नाही.”

Raj Thackeray Ashish Shelar
वरिष्ठांचा युतीबाबतचा निरोप घेऊन राज ठाकरेंना भेटलात? आशिष शेलार म्हणाले, “आम्ही साद घालायला…”
jitendra awhad dhananjay munde
“गद्दारी रक्तात असलेल्यांना…”, शरद पवारांपाठोपाठ आव्हाडांचीही धनंजय मुंडेंवर टीका; म्हणाले, “तुमची लायकी…”
Nitish kumar has till 12th for floor test
नितीश यांना विश्वासदर्शक ठरावासाठी १२ तारखेपर्यंतचा वेळ; काँग्रेस नेत्यांना काय वाटते? जाणून घ्या
Jitendra Awhad Slams Ajit Pawar
“काकांच्या मृत्यूची वाट पाहतोय, आज अजित पवारांनी हद्द पार केली, लाज वाटते…”; जितेंद्र आव्हाडांचा शाब्दिक प्रहार

हेही वाचा : “राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशाने झालं”, अजित पवारांचा खळबळजनक आरोप!

“सोळंकेंनी राजीनामा द्यायची तयारी केली होती”

“२०१९ साली देवेंद्र फडणवीसांबरोबर सरकार स्थापन केलं. तेव्हा, प्रकाश सोळंके नाराज झाले. सोळंकेंना मंत्रीमंडळात यायचं होतं. अशोक डक, मी, प्रकाश सोळंके आणि जयंत पाटील, काही वेळेला धनंजय मुंडे अशा आमच्या बैठका व्हायच्या. प्रकाश सोळंकेंनी राजीनामा द्यायची तयारी केली होती. त्यांचं मत होतं की, ‘मी पक्षासाठी काय कमी केलं? मलाही मंत्रीपद मिळालं पाहिजे.’ मात्र, सोळंकेंनी केलेली मागणी रास्त होती. शेवटी मी आणि जयंत पाटलांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी सोळंकेंना आम्ही कार्याध्यक्षपदाचा शब्द दिला,” असं अजित पवारांनी सांगितलं.

“प्रदेशाध्यपद अजूनही चाललंच आहे”

“जयंत पाटलांनी म्हटलं, ‘मी एक वर्ष अध्यक्ष राहतो, एक वर्षानंतर तुम्ही कार्याध्यक्षाचं प्रदेशाध्यक्ष व्हा.’ तेव्हा प्रकाश सोळंकेंनी मान्य केलं. वर्षभरानंतर मी जयंत पाटलांना विचारलं, आपण सोळंकेंना शब्द दिलाय. यावर जयंत पाटलांनी सांगितलं, ‘हे खरंय, पण वरिष्ठ म्हणतात, तूच प्रदेशाध्यक्ष राहा.’ मी म्हणालो, वरिष्ठांना सांगा, मला जलसंपदा विभागातून वेळ मिळत नाही. मात्र, पुढं ढकलत, ढकलत अजून चाललंच आहे. हे बरोबर नाही,” अशी नाराजी अजित पवारांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “पवार, जाधव, गायकवाड अशी कित्येक आडनावं…”, मराठा आरक्षणावरून अजित पवारांचा भुजबळ आणि जरांगेंना अप्रत्यक्ष इशारा

“कार्यकर्त्यांना नाराज करायचं, मला अजिबात आवडत नाही”

“एकदा तुम्ही शब्द दिला, एखादा महिना पुढे-मागे चालेल. शब्द देताना दहा वेळा विचार करू शब्द द्या. कार्यकर्त्यांना नाराज करायचं, मला अजिबात आवडत नाही. पण, छोट्या-छोट्या गोष्टी साठत जातात,” असं अजित पवारांनी सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar on prakash solanke president jayant patil ncp ssa

First published on: 01-12-2023 at 14:40 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×