राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अलीकडेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावरून आज विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. केवळ राजकीय विरोधक आहे, म्हणून एखाद्या नेत्याला खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन करणार वनाही, असा इशारा अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, “आपल्या नागरिकांसोबत काहीही चुकीचं घडलं असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु उगीचच विरोधकांना त्रास देण्यासाठी जर कोणाला तरी गोवण्याचा प्रयत्न… कोणी करत असेल, तर तो कुणीही सहन करणार नाही. याआधी अशाचप्रकारे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले. त्यामुळे त्यांनी अतिशय त्रासून राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. परंतु त्यानंतर शरद पवारांनी त्यांना समजावून सांगितलं. मी आणि जयंत पाटीलही आव्हाडांना भेटायला गेलो. त्यातून आम्ही मार्ग काढला.”

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
kanhaiya kumar latest marathi news
“आश्वासनांचे अपयश लपविण्यासाठीच पंतप्रधान मोदींकडून ४०० पारचा नारा”, काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांची टीका
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
Kirit Somaiya shinde fadnavis
“या सरकारमध्येही घोटाळा होणार होता, पण…”, सोमय्यांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर; भाजपावरही आरोप

हेही वाचा- मोठी बातमी: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही; बच्चू कडूंचं सूचक विधान

“वास्तविक जर कुणाच्याही चुका असतील… मग ती चूक माझी असो वा इतर कुणाचीही… तर त्यावर कारवाई करण्याबाबत कुणाचंही दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण मुद्दाम कुभाड रचून कोणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. कुणाला तरी उभं करून तक्रार द्यायला लावणं आणि नंतर कारवाई करणं. असं जर झालं तर ही महाराष्ट्राची परंपरा नाही ” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

हेही वाचा- “सरकारला पाठिंबा दिला म्हणजे आम्ही…”, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात बच्चू कडूंची थेट भूमिका

अजित पवार पुढे म्हणाले, “आम्ही जवळपास साडेसतरा वर्षे सरकारमध्ये काम करत होतो. तेव्हाही आमच्यासमोर विरोधीपक्ष होता. तेव्हा आम्ही अशाप्रकारचा प्रयत्न कदापि केला नाही. त्यामुळे आता या रस्त्याने जर कुणी जाण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ते सहन करणार नाही. जाणीवपूर्वक कुणाला गोवण्याचा किंवा अडकवण्याचा प्रयत्न केला किंवा राजकीय विरोधक आहेत, म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष म्हणून आम्हीही हे सहन करणार नाही,” असा थेट इशारा अजित पवारांनी दिला.