scorecardresearch

Video: “निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर मी लक्ष्मण जगताप यांना फोन बंद करून ठेवायला सांगितलं होतं”, अजित पवारांनी संगितली ‘ती’ आठवण!

पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झाले.

Video: “निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर मी लक्ष्मण जगताप यांना फोन बंद करून ठेवायला सांगितलं होतं”, अजित पवारांनी संगितली ‘ती’ आठवण!
अजित पवार आणि लक्ष्मण जगताप (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीची आठवण सांगितली. मी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी अर्ज भरून फोन बंद करायला सांगितले होते. त्यानंतर जगताप निवडून आले, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली. त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांची आज (५ डिसेंबर) सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>उद्धव ठाकरे- वंचितच्या युतीवर ओवैसी यांची प्रतिक्रिया, म्हणाले “हा त्यांचा निर्णय…”

“राजकीय जीवनात १९९१ साली माझा आणि पिंपरी चिंचवड शहराचा संबंध आला. त्यावेळी अनेक तरुण कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी खासदार होतो. त्यामुळे तरुणांना सोबत घेऊन पिंपरी चिंचवड परिसरात चांगले काम कसे करता येईल आणि या शहराला पुणे शहराच्या बरोबरीने कसे आणता येईल, असा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न असायचा. या सहकाऱ्यांमध्ये लक्ष्मण जगताप हेदेखील होते,” असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> माकडांसोबत सेल्फी घेण्याचा मोह जीवावर बेतला! ५०० फूट खोल दरीत कोसळून प्रवाशाचा मृत्यू

“नगरपालिका, महाालिकेतील नगरसेवक पद, स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापौरपद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद अशी वेगवेगळी पदं आम्ही लक्ष्मण जगताप यांच्याकडे सोपवली. त्यांनी ही जबाबदारी मजबुतीने पेलली. मात्र नंतरच्या काळात काही राजकीय समीकरणं बदलली. २०१४ साली राजकीय स्थित्यंतरं घडली. यातूनच लक्ष्मण जगताप यांनी वेगळा निर्णय घेतला,” असे अजित पवार यांनी सांगितले.

“असाच एक प्रसंग मला आठवतो. २००४ च्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते. उमेदवारी अर्ज भरून तुम्ही फोन बंद करा. त्यानंतर फॉर्म मागे घेण्याची मुदत असेपर्यंत फोन सुरू करायचा नाही, असे मी त्यांना सांगितले होते. त्यांनी मी जसे म्हणालो तसेच जगताप यांनी केले. त्यावेळी वरिष्ठांकडून खूप दबाव होता. काँग्रेसकडून चंदुकाका जगताप यांना तिकीट मिळाले होते. मात्र त्या मतदारसंघात आमच्या विचारांची मतं जास्त होती. मला आमच्या विचारांचा माणूस तेथून निवडून आणायचा होता. येथे निवडणूक झाली तर मी नक्की लक्ष्मण जगताप यांना निवडून आणू शकेल, असे मला वाटत होते. नंतरच्या काळात निवडणूक झाली. ही निवडणूक लक्ष्मण यांनी एकतर्फी जिंकली,” अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली.

हेही वाचा >> चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘तो’ फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; म्हणाले, “औरंगजेबजीच्या कबरीवर…”

“नंतरच्या काळात पिंपरी-भोसरी मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली. त्यांचे लोकांमध्ये काम होते तसेच संघटनकौशल्य होते. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतरही ते राष्ट्रवादीच्या विचारांशी बांधील राहिले. नंतर खासदारकीच्या निवडणुकीत २०१४ साली वेगळा प्रसंग उद्भवला. पण दुर्दैवाने या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. पुढे त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला,” असेही अजित पवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 14:37 IST

संबंधित बातम्या