Maharashtra Politics Top 5 News : बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर चार जणांचा मृ्त्यू झाला. आज (गुरूवार) हजारोंच्या साश्रू नयनांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्य आणि देशातील अनेक प्रमुख नेते बारामती येथे उपस्थित होते.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. आता वहिनींना (सुनेत्रा पवार यांना) मिनिस्ट्रीमध्ये आणावे असे म्हणत आता विखुरलेलं राहून चालणार नाही, असं सूचक भाष्य नरहरी झिरवळ यांनी केले आहे. यासह आजची महत्त्वाची पाच विधान काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates
17:50 (IST) 29 Jan 2026

संसद भवन परिसरात नितीन गडकरी व राहुल गांधींची भेट, काय झाली चर्चा?

संसद भवन परिसरात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची झालेली भेट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते काही क्षण थांबून परस्परांशी संवाद साधताना दिसतात. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

येथे वाचा सविस्तर वृत्त

संसद भवन परिसरात नितीन गडकरी व राहुल गांधींची भेट, काय झाली चर्चा?

17:49 (IST) 29 Jan 2026

Ajit Pawar : अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर निलेश लंके आणि अमोल मिटकरींचा आक्रोश, दोघांनी फोडला टाहो

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आणि खासदार निलेश लंके यांनी तर आक्रोश करत टाहो फोडल्याचे पाहायला मिळाले. या दोघांचाही आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेतल्यानंतर निलेश लंके आणि अमोल मिटकरी ढसाढसा रडले.

येथे वाचा सविस्तर वृत्त

Ajit Pawar : अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर निलेश लंके आणि अमोल मिटकरींचा आक्रोश

17:48 (IST) 29 Jan 2026

Praful Patel : “आता आपली भेट होणार नाही, मी काही दिवस बाहेर जातोय”, अजित पवारांचा प्रफुल्ल पटेलांशी फोनवर झाला होता संवाद

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील जवळपास सर्वच नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांबरोबर झालेल्या अखेरच्या संभाषणाची आठवण सांगितली आहे. विमान दुर्घटनेच्या आदल्या रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोनवर बोलेले होते. यावेळी नेमकं काय संवाद झाला होता? याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

येथे वाचा सविस्तर वृत्त

“आता आपली भेट होणार नाही, मी काही दिवस बाहेर जातोय”, अजित पवारांचा प्रफुल्ल पटेलांशी फोनवर झाला होता संवाद

17:48 (IST) 29 Jan 2026

“दलितांचा आवाज दाबण्यासाठी मला टार्गेट केलं”, अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अंजली भारतींनी व्यक्त केली दिलगिरी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कव्वाली गायिका अंजली भारती यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी एक व्हिडिओ जारी करून दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, माझ्याकडून चुकून त्या शब्दाचा वापर झाला असून मला टार्गेट करण्यात आलं असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

येथे वाचा सविस्तर वृ्त

अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अंजली भारतींनी व्यक्त केली दिलगिरी; नेमकं काय म्हमाल्या?

17:47 (IST) 29 Jan 2026

“आता विखुरलेलं राहून चालणार नाही”, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत झिरवळांचं वक्तव्य चर्चेत

अजित पवार याच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते नरहरी झरवळ यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. अजित पवारांचा वारसा पुढे कोण चालवणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ‘आता विखुरलेलं राहून चालणार नाही’, असं सूचक भाष्य नरहरी झिरवळ यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

येथे वाचा सविस्तर वृत्त

Narhari Zirwal : “आता विखुरलेलं राहून चालणार नाही”, दोन्ही NCP च्या विलीनीकरणाबाबत नरहरी झिरवळांचं वक्तव्य चर्चेत