Rohit Pawar on Plane Crash Black Box Plane Crash Investigation: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असतानाच या अपघातात विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती काल (१७ फेब्रुवारी) रोजी नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली. मात्र, या माहितीनंतर अनेकांनी यावर ताशेरे ओढले. ब्लॅक बॉक्ससारखी यंत्रणा जळू कशी शकते असा सवाल उपस्थित केला जात असतानाच, आमदार रोहित पवार यांनीही यावर आक्षेप घेतला आहे. तसंच, या अपघाताशी संबंधित सर्वच शक्यतांबाबत आज त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. हे आरोप करताना त्यांनी काही कागदपत्रे आणि पुरावेही माध्यमांना सादर केली.
“तपास यंत्रणांनी तपास सुरू केलाय, पण या तपासाचा वेग कमी आहे. मुंबई आणि दिल्लीतील पीसी झाल्यानंतर हा अपघात नसून घातपतच आहे, यावर लोकांचा विश्वास बसायला लागला आहे. वीसीआर कंपनीच्या बाबतीत मी दाखले दिले होते, त्यावर तज्ज्ञ बोलत आहेत. अधिकचे फ्युएल टँक त्या विमानात होते, अशीही शंका व्यक्त केली होती. ब्लॅक बॉक्ससंदर्भातही मी शंका उपस्थित केले होते. पण दुर्दैवं असं की नागरी उड्डाण मंत्रालयाने ब्लॅक बॉक्सचा काही भाग जळला असं पत्रक जारी केलं”, असं रोहित पवार म्हणाले.
विमानात इंधनाचा अतिरिक्त साठा
विमानाचे बरेच स्फोट झाले होते. २०२३ मध्ये जो विमान अपघात झाला, त्याचं विमान मोठं होतं. हे विमान रनवेवर पडलं होतं. रनवे डांबरी होता. पण दादांचं विमान साईडला पडलं. जर बॉल फरशीवर टाकला तर बाऊन्स जास्त होतो, पण मातीत टाकला तर कमी बाऊन्स होतो. तसंच, दादांचं विमान रनवेवर पडलं नाही, त्यामुळे त्याची वेलोसिटी कमी होती. मग स्फोट का झाला? त्यामुळे त्यात अधिकचे फ्युएल टँक होते, म्हणून स्फोट झाला ही आमची शंका खरी होत आहे. हे फ्युएल टँक टॉयलेटच्या बाजूला असतात. त्याच्याच मागच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो, असं रोहित पवार म्हणाले.
या पंखांत टँक फुल भरला होता. बारामतीला जाऊन हैदराबादला गेला असतात तरी तिथेही फ्युएल भरू शकले असते. त्यामुळे एवढं फ्युएल पंखात भरून बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? पायलटचा वापर करून घातपात झाला असावा, त्यात फ्युएल जास्त असल्याने मोठा स्फोट होईल अशी शंका खरी होताना दिसते आहे. हा फ्लाइट प्लान आहे. पण डीजीसीएला ते फ्लाईन प्लान कळवला नव्हता, असं रोहित पवार म्हणाले.
पुणे, सातारा, चिपी विमानतळावर ते उतरू शकत नव्हते. ते पुन्हा मुंबई विमानतळावर विमान उतरवू शकत होते. पण त्यांनी तसं न करता बारामतीतच लँड करण्याचा प्रयत्न केला. फ्युएल भरलं होतं, त्यात अधिकचं टँक होतं. त्यामुळे हे विमान जाणीवपूर्वक आदळण्यात आलं, असा आरोपही त्यांनी केला.
फ्लाइट प्लॅन मॅन्युपुलेट (बदल) करता येतात. गोपी नावाचा एक व्यक्ती हे काम करतो. या अपघाताचे कागदपत्र करण्याचं काम विमान कंपनी वीएसआर चालू आहे. त्यामुळे कागदी डॉक्युमेंट न घेता सीसीटीव्ही फुटेज किंवा इमेलचे पुरावे ग्राह्य धरावे, अशी विनंतीही रोहित पवार यांनी तपास यंत्रणांना केली आहे.
ब्लॅक बॉक्स कसा जळाला?
ब्लॅक बॉक्स ११०० सेल्सिअस डिग्रीवर आगीत पडला तर तो जळतो. व्हॉइस रेकॉर्डिंग असतं आणि एफडीआर असतं. किती तरी हजार हत्ती प्रेशर केले तरी ब्लॅक बॉक्सला काही होत नाही. तिथे बरेसचे कागद जळाले नव्हते. कारण, स्फोटाचा भपका काही सेकंदापुरता असतो, तो नंतर विझून जातो. तो भपका अंदाजे १००० सेल्सिअस डिग्रीच्या आसपास असू शकतो. विमानाची बॉडी अॅल्युमिनिअम अलॉय असते. ६३५ डिग्री सेल्सिअसवर हे मटेरिअल वितळू शकतं. बाकीचा भाग १७६० डिग्रीला वितळतं. विमानाची बॉडीचा भाग आत असतो, त्याच्या आत ब्लॅक बॉक्स असतो. म्हणजेच, आम्ही आज पत्रकार परिषद घेणार होतो, त्यामुळे काल नागरी उड्डाण मंत्रालयाने ब्लॅक बॉक्सविषयी घाईगडबडीत माहिती दिली, असाही दावा रोहित पवारांनी केला.
इन्शुरन्सविषयी पायलटला माहित होतं का?
“ते विमान ३५ कोटीला घेतलं होतं. पण त्या विमानाची आजची किंमत १०-१५ कोटीच आहे. पण १० कोटीतही हे विमान कोणी घेणार नाही, अशी त्याची परिस्थिती होती. आजची त्याची इन्शुरन्स व्हॅल्यु ५५ कोटी होतं. लायबॅलिटि इन्शुरन्स २१० कोटी होतं. यामध्ये पायलटही आले. यात पाचही जण आले. मेन पायलट होता, त्याला किती रुपये मिळणार हा प्रश्न आहे. ही गोष्ट त्या पायलटला माहित होतं का?” अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
अकाऊंटेबल मॅनेजर कुठे?
अकाऊंटेबल मॅनेजर, चीफ ऑफ सेफ्टी, डिरेक्टर ऑफ ट्रेनिंग यांच्या मुलाखती डीजीसीएकडून होतात. त्यांनी ओके दिल्यावरच ते कंपनी त्यांना कामावर घेते. अपघात झाल्यावर या तिघांची जबाबदारी असते. पण या प्रकरणात हे तिन्ही व्यक्ती कुठे आहेत? असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला.
सुमित कपूर दोन्ही विमाने चालवत होते
जर पायलटने लिगसी विमानाचे प्रशिक्षण घेतले असेल तर तो केवळ लिगसी उडवू शकतो. तो लेअरजेट उडवू शकत नाही. मात्र वीसीआर मध्ये पायलटकडून कोणीही विमाने उडवून घेतली जात होती. रोहित सिंग आणि सुमित कपूर हे दोघेही लिगसी तसेच लेअरजेट दोन्ही विमान उडवत होते. कागदं रंगवारंगवी करणं सोडून द्या, त्या कागदात फरक दिसला तर हे योग्य ठरणार नाही, असा इशाराही पवारांनी दिला.
पायटल विमानात कार्यरत होण्याआधी त्याची ब्रीथ अनालायजर म्हणजे दारू प्यायला की नाही याची तपासणी मशिनद्वारे केली जाते. त्याचे व्हिडिओही काढले जातात. त्यामुळे सुमित कपूर बीए टेस्टचे व्हिडिओ आम्हाला दाखवा. तसंच, वीसीआरकडे असलेल्या मशिनमध्ये तारखा बदलल्या जाऊ शकतात. म्हणून हा तपास वेगाने करण्याची आमची मागणी आहे. दरम्यान, २०२३ मध्ये अपघात प्रकरणातील पायलट सुनील कंजरचाही दोनवेळा परवाना रद्द झाला होता. दारूमुळेच त्याचा परवाना रद्द झाला होता. मोठ्या कंपन्यांत ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, ते इथं काम करतात, असा दावाही त्यांनी केला.
टेक्निकल एजंसी असताना मॉडेल चुकवले
लेअरजेट ४५ एक्सआर या विमानाचा अपघात झाला आहे. मात्र, नागरी उड्डाण मंत्रालयाने ब्लॅक बॉक्सबाबत जी माहिती दिली ती लेअरजेट ४५ ची जदिली. वीसीआर च्या वेबसाईटनुसार त्यांच्याकडे सात लेअरजेटचे विमान आहेत. त्यापैकी केवळ एकच विमान लेअरजेट ४५ आहे. डीजीसीएला विमान कुठले आहे हे माहीत नसेल तर अपघाताची चौकशी कशी होणार? टेक्निकल एजंसी असून मॉडेलमध्ये चूक कशी केली? असाही प्रश्न उपस्थित केला.
संपलेलं इंजिन अजित पवारांना दिलं
प्रत्येक विमानाची उडण्याची क्षमता होती. या विमानाची ५००० हजार तास उडण्याची क्षमता होती. अजित दादा ज्या विमानात बसले होते तेव्हा हे विमान ४९१५ तास आधीच उडाले होते. म्हणजेच कंपनीच्या म्हणण्यांनुसार फक्त ८५ तास उडण्याची क्षमता उरली होती. आम्ही सामान्य नागरिक म्हणून या विमानाची उडण्याची क्षमता तपासतो, मग अजित पवार तर झेड प्लस सिक्युरिटीचा माणूस होता. आमचा दावा आहे की हनीवेल कंपनीने हे इंजिन बनवलं आहे. त्यांनी हे इंजिन किती तास उडलंय याची माहिती द्यावी, कारण ते आम्हाला माहिती देत नाहीयत. पण आमचा दावा आहे की हे मशीन आठ हजार तास उडालं आहे. दादांकडे विमान देत असताना त्यात काहीच राहिलं नव्हतं, त्या विमानाची किंमतही कमी झाली होती. नुकसान होताना कमी व्हावं. इंजिन संपलेलं असताना अजित पवारांना सेवेसाठी दिलं, असा दावाही रोहित पवारांनी केला.
भारतात लेअरजेट विमान रजिस्टरच होऊ शकत नाही
लेअरजेट हे विमान भारतात रजिस्टर होऊ शकत नाही. हे अनधिकृतपणे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांचा वापर करून रजिस्टर करण्यात आलं आहे. त्यामुळे भारताबाहेर चांगल्या तपास यंत्रणा आणून या प्रकरणाची तपासणी झाली पाहिजे.
प्राथमिक चौकशी अहवाल कुठे आहे?
२ फेब्रुवारी रोजी चौकशीचे आदेश आले. त्यानुसार, १५ फेब्रुवारीपर्यंत चौकशी अहवाल देण्याचे आदेश होते. परंतु, अद्यापही प्राथमिक अहवाल आलेला नाही.
व्हिएसआरवर कारवाई का होत नाही?
विजय सिंग हा कंपनचा मालक आहे. त्याचा मुलगा रोहित सिंग याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. पाच स्पोर्ट्स कार आहेत. मुंबईतील डेलच्या गेस्टहाऊसमध्ये दोन गाड्या लावल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी रोहित सिंगचं जयपूरला मॅरियटमध्ये लग्न होतं. तिथे कोण कोण गेलं होतं? आमच्याकडेही याचे फोटो आहे. ते मी वापरणार नाही. कारण, आपण लग्नाला जात असतो. आमचं फक्त म्हणणं आहे की व्हिसीआरची चौकशी का होत नाही? या लग्नाला अनेक नेते, माजी मंत्री गेले होते. आंध्र प्रदेशचे टीडीपी पक्षाचे प्रमुख नेते या लग्नाला गेले होते. व्हिसीआरच्या मालकाच्या लग्नाला जाता, तेव्हा टीडीपी पक्षाचे नागरी उड्डाण मंत्री म्हणलेत की या कंपनीची चौकशी कऱण्याची गरज नाही. मग आम्ही आक्षेप का घेऊ नये? दादांचा अपघात झाल्यापासून आतापर्यंत अनेक मंत्री व्हिसीआरने प्रवास करत आहेत. सत्तेतील बरेच लोक व्हिसीआरच्या मालकाच्या निगडीत आहे. काही लोकांचे व्यवसाय आहेत, असा दावा त्यांनी केला.
रोहित सिंग कुठे?
रोहित सिंग अपघात झाल्यानंतर अमेरिकेत गेला. तो भारतात नाही. त्यांची अमेरिका आणि दुबईत कंपनी आहे. ज्या विमानाचा अपघात झाला, त्याचा मालक भारतात नाही. त्याला बाहेर जाण्यासाठी कोणी मदत केली? असा सवाल पवारांनी केला.
