Maharashtra Deputy CM Ajit Pawar Passes Away in Baramati Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. कार्यकर्त्यांनी बारामतीमध्ये गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. बारामतीमधील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Death News Live : बारामतीमधील सर्व घडोमोडी वाचा एका क्लिकवर
Ajit Pawar’s Death: शहरातील दुकाने उद्या बंद; पुणे व्यापारी महासंघाकडून श्रद्धांजली
Ajit Pawar’s Death : पिंपरी-चिंचवडमधील बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद
Ajit Pawar Dies In Plane Crash : पुणे पोलिसांच्या नवीन इमारतीसाठी अजित पवार यांचा पाठपुरावा, सुविधांसाठी वेळोवेळी निधी
Ajit Pawar Died in Plane Crash: अजित पवार यांचे आजोळ देवळाली प्रवरा शहर कडकडीत बंद ठेवून श्रद्धांजली
"दादा,हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही", छगन भुजबळांची अजित पवारांच्या निधनानंतर पोस्ट
अत्यंत धक्कादायक... विश्वास बसत नाही! बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अजितदादांसारख्या धडाडीच्या नेत्याचं असं अचानक जाणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे. त्यांच्यासारख्या उमद्या, सतत हसतमुख आणि जिंदादिल व्यक्तिच्या अकस्मात निधनाची बातमी कधी कानावर येईल, असं मलाच काय, महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला वाटलं नसेल. परंतु दुर्दैवाने हे वास्तव स्वीकारण्याची कठीण वेळ आज आपल्यावर आली आहे. व्यक्तिगत मला स्वतःलाही यातून सावरणं खूप कठीण जाणार आहे. 'कडक शिस्तीचे प्रशासक' अशी ओळख असलेल्या अजितदादांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तब्बल ११ वेळा मांडला असून ते महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरले. त्यांच्या कामाचा मुख्य भर हा प्रशासकीय शिस्त, पायाभूत सुविधा आणि आर्थिक नियोजन यांवर राहिला. पिंपरी-चिंचवड शहराला 'सर्वात वेगाने विकसित होणारे शहर' बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. बारामती, पुणे, पिंपरी चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या धडाडीच्या कामातून त्यांनी एक वेगळा ठसा निर्माण केला. तळागाळातील शेवटच्या माणसाचा विचार करणारा हा लोकनेता होता. पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागणारा हा झंझावात महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र धावत होता.
अजितदादादांशी माझे ऋणानुबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या आधीपासून आहेत. करारी, रोखठोक स्वभाव असलेल्याअजितदादांनी विचारांशी कदापि तडजोड केली नाही. मला वाटतं हेच त्यांच्या आणि माझ्या स्वभावातील साम्य होतं. त्यांनी मा. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात बारामतीच्या स्थानिक राजकारणापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पवार साहेबांप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेची नस ओळखणारा आणि सर्वसामान्यांशी जोडला गेलेला जमनीवरील नेता अशी त्यांची ओळख होती. याच जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, महाराष्ट्राच्या राजकारणावर अमीट ठसा उमटविला. स्वभावाने रोखठोक, प्रशासनावर घट्ट पकड आणि व्यक्तिमत्वात एक दरारा असलेला राजकारणी अशी प्रतिमा असूनही मनाने अतिशय स्वच्छ आणि जिंदादिल असलेल्या अजितदादांचा वावर चैतन्य निर्माण करणारा असायचा. पत्रकारांशी बोलताना प्रतिकूल असलेल्या प्रश्नांवरही मिश्किल चिमटे काढणारे दादा, अनावधानाने काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त करणारे दादा देखील या महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यांनी माझ्या ज्येष्ठत्वाचा कायम सन्मान केला. दादांनी मला आणि आमच्या भुजबळ कुटुंबाला दिलेलं प्रेम कायम स्मरणात राहील. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. अजितदादा यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना! दादा,हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही.
अजित पवारांच्या पार्थिवाचे रात्रभर दर्शन घेता येणार
बारामतीती येथील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या मैदानावर अजित पवारांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शासकीय प्रोटोकॉल पूर्ण झाल्यानंतर अजितदादांचे पार्थिव येथे आणले जाणार आहे. पुढील तासाभरात पार्थिव आणले जाणार आहे. सर्वांना रात्रभर अजित पवारांच्या पार्थिवाचे दर्शन घेता येईल. उद्या सकाळी बारामती शहरात अंत्ययात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या दुर्घटनेत बारामतीच्या रनवेची काय भूमिका? निवृत्त वैमानिकाने नेमकं काय सांगितलं?
राज्यातील शाळांना सुटी, तर मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या
Video: १६ एप्रिलचा दिवस, अजित पवारांची विमानातील आठवण, फडणवीस आणि शिंदेसोबत म्हणाले, अब आप सभी खुर्सी की पेटी…
Ajit Pawar Died in Plane Crash: व्यापाऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न
"सूर्याच्या साक्षीने दादांचे काम सुरू व्हायचे...", अजित पवारांच्या निधनानंतर रुपाली चाकणकरांची पोस्ट
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला, दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरक केलं. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली. सूर्याच्या साक्षीने दादांचे काम सुरू व्हायचे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपले काम करतील हा विश्वास वाटायचा हीच दादांची ओळख होती. दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच्या कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची. आम्हा सर्वांना दादांची आदरयुक्त भीती होती, संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजावून सांगायचे. शेवटच्या घटकांला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे, महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते. आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला पोरका झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली..!"
भाजपाचे अनेक दिग्गज नेते बारामती येथे दाखल
राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, जयकुमार गोरे, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, बारामती विमानतळ वर दाखल झाले आहेत.
Ajit Pawar Died in Plane Crash: अजितदादांच्या अकाली निधनाने पिंपरी-चिंचवडमधील नेते गहिवरले
"आधारस्तंभ हरपला, दादांचे निधन माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी," प्रफुल्ल पटेलांची पोस्ट
"आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने आमचा आधारस्तंभ हरपला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. गेली अनेक वर्षे मी त्यांच्यासोबत काम केले. जेव्हा-जेव्हा दादांसोबत भेट होत असे, ते नेहमीच आस्थेने चौकशी करत. तब्येतीची काळजी घेण्याचा नेहमीच सल्ला देत असत. त्यांचे आणि माझे राजकारणापलीकडे कौटुंबिक संबंध होते. दादांचे निधन ही माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी आहे. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक कुशल प्रशासक, कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले आणि ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व आपण गमावले आहे. जवळपास ३५ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडवले, जनतेसाठी तत्पर असणारे पुरोगामी विचारांचे नेतृत्व घडवले तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव लढा दिला. ज्या ज्या वेळी दादांशी भेट व्हायची, तेव्हा-तेव्हा सामान्य माणसाच्या अडीअडचणी, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, हे आपुलकीने व तळमळीने ते मांडायचे आणि त्यासाठी आग्रही असायचे. सर्वसामान्य जनतेचे लाडके नेतृत्व आज आपल्यात राहिले नाही, ही अत्यंत दुःखद घटना आहे. आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस ठरला आहे. मा. श्री. अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबियांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो. तसेच पवार कुटुंबियांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ॐ शांती"
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तबद्ध नेतृत्व हरपले; पालकमंत्री नितेश राणे यांनी वाहिली श्रद्धांजली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या निधनाने गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्राच्या समाजकारणात सेवा देणारे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दांत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजितदादांच्या कार्याचा गौरव करताना नितेश राणे म्हणाले की, प्रशासनावर असलेली त्यांची पकड, सहकार क्षेत्राची जाण, निर्णयक्षमता आणि कामातील शिस्त यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. जनसामान्यांसाठी अखंड झटण्याची त्यांची वृत्ती ही कायम लक्षात राहील.
राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची कार्यतत्परता असंख्य कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मला त्यांना जवळून अनुभवता आले, त्यांच्या नेतृत्वाचा ठसा राज्याच्या इतिहासावर कायम राहील, असेही राणे यांनी नमूद केले.
"अजितदादा पवार यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सावरण्याचे बळ देवो," अशी प्रार्थना पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे.
अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार; पंतप्रधान मोदी, अमि शाह राहाणार उपस्थित
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भीषण विमान दुर्घटनेत निधन झाले आहे, त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
अजितदादांच्या निधनाने राजकारणातील निर्भीड नेतृत्व हरपले; खासदार नारायण राणे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
सावंतवाडी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्रातील निर्भीड आणि कार्यक्षम नेतृत्व हरपले आहे. राजकारणाच्या प्रवासात अनेक संघर्ष आले, पण अजितदादा ठाम निर्णय घेणारे नेते होते आणि सामान्य माणसाच्या वेदनांशी नेहमी आपले नाते जपले.”
राणे यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीवरही भाष्य करत म्हटले की, “दादांचा स्वभाव हा शब्दांपेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवणारा होता. त्यांनी कधीही जबाबदारीला पाठ फिरवली नाही आणि जनतेच्या समस्यांसाठी नेहमी सज्ज राहायचे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात एक वेदनादायक पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखद क्षणी मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे आणि ईश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”
महाराष्ट्राचा 'विकास पुरुष' हरपला; अजित पवार यांच्या निधनाने राज्याची मोठी हानी - माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले
सावंतवाडी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे 'विकास पुरुष' म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी भावूक शब्दांत श्रद्धांजली वाहिली आणि सांगितले की, "महाराष्ट्राने एक कर्तबगार नेतृत्व गमावले असून, ही माझी वैयक्तिक हानी आहे."
भोसले म्हणाले की, "अजित पवार केवळ माझे राजकीय सहकारी नव्हते, तर माझे कौटुंबिक स्नेही होते. शरद पवार आणि माझ्यामध्ये ते एक मजबूत दुवा म्हणून काम करत असत. त्यांनी नेहमीच माझ्या राजकीय जीवनाला प्रोत्साहन दिले. आज मी माझा जवळचा मित्र गमावला आहे, याचे मला अतिव दुःख होत आहे."
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासातील पवारांचे योगदान भोसले यांनी उजागर केले. "अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची पूर्ण क्षमता होती, मात्र दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. अशा कर्तबगार नेत्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो," असे भोसले यांनी प्रार्थना केली.
अजित पवार यांच्या निधनाने राजकारणात मोठी पोकळी; आमदार दीपक केसरकर यांनी वाहिली श्रद्धांजली
सावंतवाडी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या भावनांमध्ये व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, अजितदादा स्पष्टवक्ता आणि उत्कृष्ट प्रशासक होते; बोलण्यात कटूता असली तरी मनातून ते अत्यंत प्रेमळ आणि जनतेसाठी तत्पर होते.
केसरकर यांनी आपल्या जुना आठवणींना उजाळा देत सांगितले की, "मी राष्ट्रवादीत असताना आमचे अतिशय निकटचे संबंध होते. दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात मी होतो. ते पक्षात राहावे, अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांचे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही."
राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दादांच्या कटाक्षाचेही केसरकर यांनी कौतुक केले. त्यांनी सांगितले की, "ते अर्थमंत्री असताना विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. कठोर निर्णय घेताना ते मागे-पुढे पाहत नसत. आसाम मधुन पक्षाची भूमिका मांडत असतानाही दादांनी माझ्या कामाचे कौतुक केले."
"कालची दादांची आणि माझी शेवटची भेट… ", अजित पवारांच्या निधनानंतर भाजपा नेत्याची भावनिक पोस्ट
"कालची दादांची आणि माझी शेवटची भेट… पायाभूत सुविधा समितीच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसी यांच्यासमवेत आम्ही सर्व उपस्थित होतो. नेहमीप्रमाणे दादांचा आत्मविश्वास, मिश्कीलपण आणि कामावरील पकड तशीच होती. कोणालाही कल्पना नव्हती की ती भेट शेवटची ठरणार आहे. आजही दादांच्या नसण्याची कल्पना मनाला मान्य होत नाही. क्षणोक्षणी वाटत राहते आता दादांचा फोन येईल, एखाद्या मुद्द्यावर ठाम शब्दांत चर्चा करतील, नेहमीसारखं हसत म्हणतील, “चला, कामाला लागूया.” दादा… आपली ही धक्कादायक एक्झिट आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड झटणारा, निर्णयक्षम नेतृत्वाचा आधार अचानक हरपल्याची पोकळी शब्दांत मांडता येणार नाही. तुमची आठवण नेहमी येईल, तुमची उणीव नेहमी जाणवत राहील, " अशी पोस्ट भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
अजितदादांच्या जाण्याने मनाला चटका : मंत्री पंकजा मुंडे
मुंबई : दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती!! ... तुम्ही जीवाला चटका लावून गेलात... तुम्ही सदैव स्मरणात रहाल.. तुमच्याबरोबर प्रवास केला, चर्चा केल्या, अगदी गप्पाही खूप मारल्या.. तुमचा राजकीय आणि अॅकडमिक सेन्स खूप जबरदस्त होता. तुमच्या भाषणातून, विनोद बुद्धीने तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं. पण आज तुमच्या जाण्याने तुम्ही कार्यकर्त्यांना रडवलं, असा अनुभवी नेता होणे नाही. महाराष्ट्र एका डायनॉमिक नेत्याला मुकला.. गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे आदरांजली, अशा शब्दांत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली.
मुंडे म्हणाल्या की, अजितदादांनी आपल्या कामाने, आपल्या वागण्याने राज्याच्या राजकारणात एक वेगळा दरारा निर्माण केला होता. राजकारणात शब्दांला जागणारे म्हणून सर्वांनाच ते परिचत होते. जनतेत रमणारा, जनतेसाठी झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही. कुशल प्रशासक, दिलेला शब्द पाळणारे व कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले व्यक्तिमत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखले जाते. अशा अजित दादांच्या अकाली निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील सुसंस्कृत दादा व्यक्तिमत्व हरपले. आपल्या अभ्यासू वृत्तीने व कामाच्या झपाट्याने वेगळा ठसा उमटविणाऱ्या दादांना महाराष्ट्र विसरू शकत नाही. हे दुःख पचविण्याची ताकद परमेश्वर पवार कुटुंबियांना देवो, अशा शब्दांत मुंडे यांनी शोक व्यक्त केला.
"दादा गेले!", अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोस्ट
"दादा गेले! जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे," अशी पोस्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
अजितदादा पवारांचा वस्त्रोद्योगाशी जुळला धागा!
Ajit Pawar Died in Plane Crash: शेवटच्या नांदेड दौर्यात पवारांचा दिलखुलास संवाद !
बारामती येथे अजित पवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी
बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो हातत घेतलेले समर्थक मोठ्या संख्येने जमले आहेत.
हळहळ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर मिरा भाईंदरच्या लोकप्रतिनिधींकडून श्रद्धांजली
Ajit Pawar Sports Olympic: मैदानात न उतरताही 'मॅच विनर'; क्रीडा क्षेत्रावर अजित पवारांची 'पॉवरफुल' पकड!
अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर राष्ट्रवादीत नेतृत्वाची पोकळी… पक्षाची धुरा आता कोणाकडे?
अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, या काळात महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, तिथे तो अर्ध्यापर्यंत खाली ठेवला जाईल. या काळात कोणताही शासकीय करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. तसेच, बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील.

