“फुटपाथवर टोपली विकणाऱ्या आईचा मुलगा आमदार होऊ शकतो. भविष्यात राज्याचा मंत्री देखील होऊ शकतो.”, असे मत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

अजित पवार हे चंद्रपूर दौऱ्यावर असतांना त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहचत अम्माची भेट घेत ‘अम्मा का टिफिन’ या उपक्रमाबद्दल माहिती घेतली.

गरजवंतांसाठी सुरु असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजु कारेमोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, नगरसेवक दीपक जयस्वाल, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, संजय वैद्य, रोटरी क्लब चंद्रपूरचे प्रकल्प प्रमुख अजय जयस्वाल आदींची उपस्थिती होती.

पाहा व्हिडीओ –

जेवणाच्या दर्जाचेही कौतुक केले –

या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज १०० टिफिन गरजूंच्या घरी पाठविले जात आहे. जेवणाच्या दर्जाचेही त्यांनी कौतुक केले. या प्रसंगी अजित पवार यांनी अम्माच्या प्रकृतीची विचारपुस करत यावेळी अम्मानेही मनमोकळेपणाने अजित पवार यांच्याशी बातचित केली. अम्माने गरिबीचे चटके सोसत कष्टाने कुटुंबाला सक्षम केले आहे. आजही त्या टोपली विकण्याचा व्यवसाय करतात.