scorecardresearch

Premium

“निवडणूक आयोगाचा निर्णय…”, अध्यक्षपदाच्या निवडीवरून अजित पवारांचं विधान

शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून अध्यक्षपदाबाबत विविध दावे केले जात आहेत.

ajit pawar name omitted from chargesheet
उपमुख्यमंत्री अजित पवार (संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटात सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा केला आहे. यानंतर आता अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला. ३० जून रोजी अजित पवार गटाने बैठक घेतली आणि अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केलं, अशा आशयाचं वक्तव्य प्रफुल्ल पटेलांनी केलं. पटेल यांचा दावा स्वत: शरद पवार यांनी फेटाळून लावला. प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य १०० टक्के खोटं आहे, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांच्या प्रतिक्रियेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

sharad pawar
राष्ट्रीय अध्यक्ष मीच! पवारांचा पुनरुच्चार : निवडणूक आयोगापुढे आज सुनावणी
Sharad Pawar in Delhi 3
“७० जणांनी अध्यक्षपदासाठी माझं नाव दिलं, त्यापैकी…”, दिल्लीतील बैठकीत शरद पवारांचं मोठं विधान
Rahul Narwekar
“मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली की…”, आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचं वक्तव्य
Rajnish Seths
एमपीएससीच्या अध्यक्षपदासाठी रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर?

हेही वाचा- एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

अजित पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “तो प्रस्ताव आता निवडणूक आयोगासमोर आहे. निवडणूक आयोग प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेईल आणि निर्णय देईल. कालच मी मराठी भाषेत अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं, निवडणूक आयोग जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल.”

हेही वाचा- “एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकत नाहीत”; भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं मोठं विधान, थेट सांगितली कारणं

अजित पवार गटाने केलेले दावे शरद पवारांनी फेटाळून लावल्याबाबत विचारलं असता अजित पवार पत्रकारांवर भडकले. यावेळी ते म्हणाले, “आम्ही आमची भूमिका तुम्हाला सांगायला बांधील नाहीत. आमचं प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेलं आहे. यावर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. आम्हाला जो काही पत्रव्यवहार करायचाय आणि जी भूमिका मांडायची आहे, ती आम्ही वकिलामार्फत मांडू. निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केल्यावर सर्व संभ्रम दूर होईल.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar reaction on ncp chief post sharad pawar faction claim rmm

First published on: 26-09-2023 at 21:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×