राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा दौऱ्यात खंडणीखोरांना सज्जड दम दिला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील काही भागातील काही लोकप्रतिनिधी चुकीचं वागत असल्याचं आणि त्याबाबत एक व्हिडीओ क्लिप मिळाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच विकास कामात अडथळा आणला तर ती व्यक्ती माझ्या घरातील असो की राष्ट्रवादीची असो, आम्ही पोलिसांना कारवाई करण्यास सांगतो, असंही अजित पवारांनी नमूद केलं.

अजित पवार म्हणाले, “सातारकरांनो लोकप्रतिनिधींनी नीट कामं केली तरच विकास होतो. काही अडचण आली तर ठेकेदाराला मदत करायची असते. पुण्यात रांजणगाव, इंदापूर, बारामती, सडसवाडी, तळेगाव, चाकण, जेजुरी, सासवड अशा अनेक ठिकाणी एमआयडीसी झाली. तिथं कोणी उद्योगपतीच्या विकास कामात आड आलं तर आम्ही अडथळा आणणारा आमच्या जवळचा आहे की लांबचा आहे हे बघत नाही.”

ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
Supriya Sule, Sharad Pawar,
भाजपचे एकच स्वप्न, शरद पवारांना संपवणे; सुप्रिया सुळेंचा पुनरुच्चार
What Ram Satpute Said?
“सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना १२ अतिरेक्यांना वाचवलं”, राम सातपुतेंचा गंभीर आरोप
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा

“…तर आम्ही माझा घरातील असो किंवा राष्ट्रवादीचा असो पोलिसांना कारवाई करण्यास सांगतो”

“बारामतीत उद्योग मालकाने फोन करून लोकं अडचणी निर्माण करतात असं सांगितलं, तर तो माझा घरातील असो किंवा राष्ट्रवादीचा असो आम्ही पोलिसांना कारवाई करण्यास सांगतो. उद्योगांसाठी चांगलं वातावरण असलं पाहिजे. उद्योगपतीला देखील आपण लावलेला पैसा परत मिळेल, बँकेचे हप्ते परत जाणार आहेत हा विश्वास मिळाला पाहिजे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“मला गावात काही लोकांनी थांबवलं, हार घातला आणि शुभेच्छा देताना म्हणायचे आता रस्ता बघा कसा आहे. मी म्हटलं बरं बाबा बघतो, ते माझं कामच आहे,” असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल टिपण्णीही केली.

“महाराष्ट्रात काही भागात काही लोकप्रतिनिधी चुकीचं वागत आहेत”

अजित पवार पुढे म्हणाले, “दुर्दैवाने महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात विकास कामांमध्ये अडथळे निर्माण केले जात आहेत. मध्यंतरी नितीन गडकरी यांनी देखील मुख्यमंत्र्यांसह आम्हा सर्वांकडे तक्रार केली होती. महाराष्ट्रात काही भागात काही लोकप्रतिनिधी चुकीचं वागत आहेत. त्यामुळे तेथील कामात अडचणी येत आहेत. ठेकेदार आम्हाला तेथे काम करायचं नाही असं म्हणतात. तेच माझ्या टेंभुर्णे ते साताराच्या कामात घडलं आहे. तिथं ठेकेदाराला त्रास दिला जातो.”

हेही वाचा : अजित पवारांनी माजी राज्यमंत्र्यांची अक्कल काढल्याने मावळात कलगीतुरा, भाजप-राष्ट्रवादीत राजकारण तापले

“मला एक व्हिडीओ क्लिप मिळाली, त्यानंतर मी ताबडतोब…”

“मला आत्ता एक क्लिप मिळाली. त्यानंतर मी ताबडतोब पोलीस अधीक्षकांना बोलावलं. मी अभयसिंग जगताप यांच्या घरात जेवायला थांबलो होतो तेव्हा पोलीस अधीक्षकांना ती क्लिप दाखवली. तसेच संबंधितांना बोलावून ठेकेदाराचं काही चुकत असेल तर त्याला समजाऊन सांगण्यास सांगितलं. मात्र, लोकप्रतिनिधींच्या नावावर कुणी चुकीचं काम करत असेल तर ते खपवून घेऊ नका, असं पोलिसांना सांगितलं आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.