राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नेहमीच त्यांच्या खास शैलीसाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अजित पवार हे नेहमीच सभागृहामध्ये तसेच सार्वजनिक कार्यक्रमात विकासकामांबद्दल बोलताना स्पष्ट भूमिका मांडताना दिसतात. बारामतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना कानपिचक्या दिल्या. एका कार्यक्रमात अजित पवारांनी निधी वाटपावरून केलेल्या विधानावरुन दत्तात्रेय भरणेंना आपल्या पदाची आठवण करुन दिल्यानंतर एकच हशा पिकला.

पुरंदर तालुक्यातील एक कार्यक्रमात अजित पवार यांनी दत्तात्रेय भरणे यांना मिश्कीलपणे आपल्या पदाची आठवण करुन देताना तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असल्याचे म्हटले. पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस या वातानुकूलित नुतन वास्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी

“सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्ता भरणे यांच्या विभागातून इंदापूर तालुक्‍यातील सर्वाधिक निधी दिला जात आहे. आम्हालाच मामांना विनंती करावी लागते की, बारामतीला देखील काही निधी द्या. बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात आहेत. पण त्यांना माहीत नाही, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत”, असे अजित पवार म्हणाले.

“मी तिजोरी उघडली आणि बांधकामाला पैसे दिले तरच ते देणार, नाहीतर काय देणार **…?” असेही अजित पवार म्हणाले. यावर आता गाडी घसरायला लागलीय त्यामुळे थांबतो, असं म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.

बारामतीला एक पळी जास्त वाढेन – अजित पवार

“यावेळी मी निधी वाटपाच्या संदर्भात मुंबईत गेल्यावर आपल्या इथेही निधी देण्याचे काम करणार आहे. तुम्ही अजिबात शंका बाळगू नका. वाढत्या उंचीचा असल्याने आपल्या जवळच्या लोकांच्या ताटात जरा जास्तचं पडत असतं हे तुम्हाला माहितीच आहे. मी जेव्हा हे वाढपी म्हणून वाढणार आहे त्यावेळी सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न करेन. पण बारामती आणि निंबूला एक पळी जास्त वाढेन एवढी नोंद घ्यावी,” असे अजित पवार म्हणाले.