महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा झालेला प्रयोग हा सगळ्यांनाच धक्का देणारा ठरला होता. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार नाहीत असंच सगळ्यांना वाटत होतं. मात्र तसं घडलं. शरद पवार आणि संजय राऊत हे महाविकास आघाडीचे दोन प्रमुख शिल्पकार मानले जातात. महाराष्ट्रात २०१९ ला शिवसेनाला ५६ आणि भाजपाला १०५ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीलाच कौल दिला होता. मात्र हा प्रयोग झाला आणि एक वेगळंच समीकरण महाराष्ट्राने पाहिलं. आता याच प्रयोगावर अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भाष्य केलं आहे.

एका पक्षाचं सरकार हे महाराष्ट्रात १९९० पासून नाही

१९९० पासून जर आपण निवडणुका आणि त्यानंतर येणारे निकाल पाहिले तर एका पक्षाचं सरकार हे महाराष्ट्रात कधीच आलेलं नाही. १९९० ते १९९५ या कालावधीत दोन पेक्षा अधिक पक्ष सत्तेत होते. १९९५ ला शिवसेना आणि भाजपा युतीचं सरकार आलं पण त्यात अपक्षांचा पाठिंबा लागला होता. १९९९ मध्येही तसंच घडलं. २०१४ मध्ये भाजपाचं एकट्याचं सरकार येईल असं वाटलं होतं कारण त्यांच्या १२२ जागा आल्या. पण तेव्हाही संपूर्ण निकाल जाहीर व्हायच्या आत आमच्या वरिष्ठांनी भाजपाला पाठिंबा देऊन टाकण्याचा पराक्रमक केला असं अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले. तसंच यानंतर त्यांनी २०१९ च्या महाविकास आघाडीच्या प्रयोगावर भाष्य केलं.

What Ajit Pawar Said About Sharad Pawar?
Ajit Pawar : “शरद पवारांचं राजकारण मलाच नाही तर महाराष्ट्रात कुणालाच…”, अजित पवार काय म्हणाले?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Uddhav Thackery
Uddhav Thackeray : “संघर्षाची ठिणगी पडू द्यायची नसेल तर…”, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनासाठी उद्धव ठाकरेंचा पोलीस आणि EC ला इशारा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

महाविकास आघाडीबाबत काय म्हणाले अजित पवार?

२०१९ मध्ये कुणाचंही बहुमत झालं नाही. भाजपा-शिवसेना युती निवडून आली होती. मात्र त्यांच्यात फूट पडली. त्यातून शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी आयुष्यात कुणाला वाटलं नसेल अशी आघाडी होईल पण ती झाली. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर अशी आघाडी कधीच झाली नसती. पण ती झाली, त्यानंतर ती अडीच वर्षे चालली. त्यानंतर काय घडलं ते सगळ्यांनी पाहिलंच आहे. असं अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले.

हे पण वाचा- ‘घड्याळ’ न्यायप्रविष्ट असल्याचे जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला पुन्हा बजावले

२०१९ ला नेमकं काय झालं होतं?

२०१९ ला महायुतीने म्हणजेच शिवसेना आणि भाजपाने एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाला १०५ जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. दोघांच्याही युतीला जनतेने कौल दिला होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावर दोन्ही पक्षांचा वाद झाला. हा वाद शमला नाहीच उलट प्रचंड विकोपाला गेला. ज्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार अस्तित्वात आलं. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे हा प्रयोग हा राज्याच्या राजकारणात कुणीही विचारही केला नसेल असा प्रयोग ठरला. याबाबत अजित पवारांनी ( Ajit Pawar ) महत्त्वाचं भाष्य केलं आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर महाविकास आघाडी झाली नसती असं त्यांनी म्हटलं आहे. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Story img Loader