भाजपामुळं गाजर म्हणतंय माझं नाव बदला, अजित पवारांचा टोला

भाजपा सत्तेवर येण्यााधीपासून आश्वासनांचे गाजर दिले आहे. भाजापमुळे गाजर म्हणतंय माझं नाव बदला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे

अजित पवार

भाजपाने सत्तेवर येण्यााधीपासून आश्वासनांचे गाजर दिले आहे. भाजापमुळे गाजर म्हणतंय माझं नाव बदला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. पिंपरी चिंचवड येथील हल्लाबोल मोर्चातील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी गॅसदरवाढीवर बोलताना अजित पवारांची जीभ मात्र घसरली.

अजित पवार यांनी सभेत बोलताना गॅसचे दर किती असा प्रश्न पिंपरी चिंचवडच्या जनतेला विचारला असता, एका नागरिकाने आठशे रुपये तर दुसऱ्याने ८५० रुपये असल्याचं म्हटलं. यावर बोलताना अजित पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर देत तुझीच लाल असा शब्द प्रयोग केला. त्यामुळे सभेतील नागरिकांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ, जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, भाजपाने सत्तेवर येण्याअगोदर पासून अनेक आश्वासनांटे गाजर दिले आहे. भाजपमुळं गाजर म्हणतंय माझं नाव बदला. असं म्हणत अजित पवार यांनी भाजपाची खिल्ली उडवली. तर भाजपाची आढी नासून गेली आहे ते कशाला आम्हाला नासके म्हणत आहेत. उलट भाजपाचे भाजप मध्ये कसे राहतील याची त्यांनी काळजी घ्यावी असा पलटवार अजित पवार यांनी पालक मंत्री गिरीश बापट यांच्या वक्तव्यावर केला. गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सडके आंबे पक्षात घेऊ नका अशी टीका केली होती, त्यावर त्यांनी प्रतिउत्तर दिलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajit pawar targets bjp

ताज्या बातम्या