सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी प्रशासकीय लवाजमा, पोलीस बंदोबस्त न घेता तसेच कोणालाच माहिती न होता, मोजके पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचे दर्शन घेतले. माळेगाव साखर कारखान्याच्या एका संचालकाने विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजित पवारांचा एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजय व्हावा, असा नवस केला होता. तो पूर्ण करण्यासाठी पवार येथे आले होते.

विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजय व्हावा, असा नवस माळेगाव साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र ढवाण पाटील यांनी श्री सेवागिरी महाराजांच्या चरणी केला होता. उपमुख्यमंत्री पवार त्याप्रमाणे निवडूनही आले. गेली ४५ वर्षे नेहमी श्री सेवागिरी दर्शनाला येणाऱ्या ढवाण पाटलांनी बोललेला नवस फेडण्यासाठी आज शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पुसेगावात आले. आजच्या दौऱ्याबाबत सातारा प्रशासनाला माहिती होती. पोलिसांना कल्पना होती. मात्र, आज उपमुख्यमंत्र्यांबरोबर पोलीस गाड्यांचा ताफा, प्रशासकीय यंत्रणाही नव्हती. त्यांनी तशी सक्त सूचना सातारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना करण्यात आली होती असे समजते.

Ajit Pawar statement on Ladki Bahin Scheme money
अपात्र ‘लाडक्या बहिणीं’चे पैसे परत घेणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Ganpat Gaikwad wrote letter to Kalyan Dombivli Municipal Commissioner with jail approval
गणपत गायकवाड यांचे तुरुंगातून विकास कामांसाठी कडोंमपा आयुक्तांना पत्र
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप

हेही वाचा >>>स्वामी समर्थ साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा; तारण साखरेची विक्री, सोलापूर जिल्हा बँकेची फसवणूक

पुसेगावात आल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिराला भेट देऊन संजीवन समाधीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. देवस्थानाचे मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधिर जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, माळेगाव साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तानाजी देवकाते, सागर जाधव, बन्सीलाल आटोळे, संजय काटे, मंगेश जगताप, पंकज भोसले, देवस्थानचे सचिव विशाल माने व ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी विश्वस्त रणधिर जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ यांनी पंढरपूर येथे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे भक्तनिवास बांधण्याची आणि पुसेगाव येथील मंदिराशेजारील घाटावर वाहनतळ व्यवस्था करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अजित पवार यांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

Story img Loader