अजित पवारांनी केलं नव्या सीबीआय संचालकांचं स्वागत; म्हणाले…

सुबोधकुमार यांनी याआधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले आहे.

संग्रहीत

ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रमुखपदी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने सोमवारी या पदासाठी सुबोधकुमार यांची निवड केली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी सुबोधकुमार जयस्वाल यांचं स्वागत केलं आहे.

सुबोधकुमार जयस्वाल सीबीआय संचालकपदी

“महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी सीबीआयच्या संचालक पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्याची सीबीआय संचालकपदी झालेली निवड राज्याचा गौरव वाढवणारी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!” असं अजित पवार म्हणाले आहेत.

सुबोधकुमार सीबीआय संचालक म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. सुबोधकुमार यांनी याआधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले आहे.

तेलगी ते भीमा कोरेगाव प्रकरणांच्या तपासाचा जयस्वाल यांना अनुभव

तेलगी प्रकरणापासून ते एल्गार परिषद, भीमा कोरेगाव, मालेगाव बॉम्बस्फोट अशी विविध प्रकरणे हाताळणारे सुबोधकुमार जयस्वाल आता केंद्रीय अन्वेषण विभागाचा कार्यभार हाताळणार आहेत. पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून राज्य सरकारशी वाद झाल्यानंतर जयस्वाल यांची केंद्रात नियुक्ती झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajit pawar welcomes new cbi director said msr

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या