नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब;  २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान आयोजन

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वतीने आयोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन यंदा नागपूरमध्ये२२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. मुंबईत झालेल्या  नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. ३२ वर्षांनी नाटय़ संमेलन आयोजित करण्याचा मान विदर्भाला मिळाला आहे.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
3000 Women in Akola, Read Constitution s Preamble, 75 thousand times, Amrit Jubilee Year, 75 year of indian constition, akola news, indian constitution news, indian constitution reading, 3000 Women reading constitution,
अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन
nagpur court marathi news, local self government body marathi news
स्वराज्य संस्थांच्या फलकांवर मराठीसह इतर भाषेचा वापर चुकीचा नाही, उच्च न्यायालयाचे एका प्रकरणात मत
Displeasure of office bearers in BJPs election planning meeting
अलिबाग : भाजपच्या निवडणूक नियोजन बैठकीतही पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर…

नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा झाली, परंतु स्थळाबाबत निर्णय झाला नव्हता. यावर्षी नाटय़ संमेलनासाठी ९ प्रस्ताव आले होते. त्यापैकी सात स्थळांनी प्रस्ताव आधीच मागे घेतले. त्यामुळे लातूर आणि नागपूर अशी दोन स्थळे स्पर्धेत होती. आज गुरुवारी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत  नागपूरवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नागपूर शाखा या संमेलनाचे आयोजन करणार आहे.

दरम्यान, नाटय़ संमेलन नागपूरला घेण्याचे निश्चित झाले असून शहरातील कलावंतांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कुठलेही वाद न होता सर्वाना विश्वासात घेऊन नाटय़ संमेलन यशस्वी करू, असा विश्वास नाटय़ परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल फरकसे आणि मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी व्यक्त केला. नागपुरात सुरेश भट सभागृह आणि रेशीमबाग मैदान या ठिकाणी नाटय़ संमेलन होणार आहे.

३३ वर्षांनंतर पुन्हा बहुमान

विदर्भात यापूर्वी १९१२ मो.वि. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीला, १९३९ मध्ये कारखानीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला, १९६२ मध्ये शं.नी. चाफेकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला, १९७५ मध्ये भालचंद्र पेंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळला, १९८२ मध्ये पं. वसंतराव देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्याला आणि १९८५ मध्ये प्रभाकर पणशीकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला संमेलन झाले होते. आता १९८५ नंतर विदर्भात २२ ते २५ फेब्रुवारी २०१९ मध्ये ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली ३३ वर्षांनंतर नाटय़ संमेलन होत आहे.

नागपूरकर संमेलन यशस्वी करतील

९९ व्या नाटय़ संमेलनासाठी लातूर आणि नागपूर असे दोन प्रस्ताव होते. दोन्ही शहरांतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. दोन्ही संमेलन स्थळांची पाहणी यापूर्वीच करण्यात आल्यामुळे नागपूरचे नाव जाहीर करण्यात आले. नागपुरातील सर्व कलावंत एकत्र येऊन नाटय़ संमेलन यशस्वी करतील, असा विश्वास आहे. मध्यवर्ती शाखेचे सर्व पदाधिकारी आणि कलावंत त्यासाठी मेहनत घेतील. – प्रसाद कांबळी, अध्यक्ष, अ.भा. मराठी नाटय़ परिषद