एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे अकोल्यात मध्यरात्री दंगल उसळली होती. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती आटोक्यात आणली खरी, परंतु या दंगलखोरांनी जुन्या शहर भागात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ केली आहे. यात आतापर्यंत १० दंगलखोर आणि दोन पोलीस जखमी झाले आहेत. शहरातील हरिहरपेठमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी वाहनं पेटवली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अग्निशमन दलाच्या वाहनांची देखील तोडफोड केली आहे. या दंगलीनंतर अकोला शहरातील अनेक भागांमध्ये कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दंगलखोरांनी पोलीस ठाण्याबाहेरही दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे.

इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे आधी भांडण आणि दोन गटांमध्ये राडा झाला. त्यानंतर पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करत होते. त्याचवेळी पोलीस ठाण्याबाहेर दगडफेक सुरू झाली. गर्दी पांगवण्यासाठी पोलीस बाहेर पडले. परंतु तोवर दंगलखोरानी जाळपोळ सुरू केली होती. त्यानंतर पोलिसांना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिक पोलीसफाटा मागवावा लागला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या.

Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Maruti Suzuki Recalls Over 16000 Cars in India
मारुतीच्या बलेनोसह फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘या’ कारमध्ये आढळला दोष; १६ हजार कार माघारी बोलविल्या, ‘हे’ आहे कारण…

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने सांगितलं की, अकोल्यातील घटनेबाबत ते काल रात्रीपासून डीजीपी आणि अकोला पोलिसांच्या संपर्कात होते. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून परिसरात शांतता आहे. आतापर्यंत सुमारे ३० आरोपींना अटक करण्यात आली असून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, रात्री शहरात जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना शहराच्या काही भागात अचानक दगडफेक सुरू झाली. दंगलखोरांनी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला. दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या. शहरातल्या संमीश्र वस्ती असलेल्या भागात कलम १४४ अंतर्गत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.