Akshay Shinde Encounter Jitendra Awhad Sharad Alleged Eyewitness Audio Clip : बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. १२ व १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. बदलापूरकरांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली. या प्रकरणात अक्षय शिंदे मुख्य आरोपी असला तर शाळेचे संस्थाचालकही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. हे सर्व आरोपी सध्या फरार आहेत. त्यांना पकडण्याआधी व अक्षय शिंदेंकडून चौकशीत अधिक माहिती मिळण्याआधीच पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला आहे. पोलिसांचं पथक अक्षय शिंदेला घटनास्थळी घेऊन गेलं होतं. त्याचवेळी त्याने एका पोलिसाकडून बंदूक हिसकावून थेट पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर प्रतिहल्ला केला. ज्यामध्ये अक्षय शिंदे जागीच ठार झाला.

या एन्काउंटर प्रकरणानंतर पोलिसांवर टीका होऊ लागली आहे. पोलिसांनी जाणूनबुजून अक्षयची हत्या केल्याचा, या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी हे एन्काउंटर केल्याचा आरोप होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत मोठा आरोप केला आहे. ही क्लिप कथित प्रत्यक्षदर्शींची असल्याचा आव्हाडांचा दावा आहे. या व्यक्तीने एन्काउंटर पाहिलं असल्याचं आव्हाडांचं म्हणणं आहे. आव्हाड यांनी म्हटलं आहे की “अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काउंटर म्हणून संबोधले जाते आहे. ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती”.

DCM Eknath Shinde first Reaction
Eknath Shinde: “आधी मी CM म्हणजेच ‘कॉमन मॅन’ होतो, आता DCM…”, शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Chhagan Bhujbal On Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदेंच्या नाराजीवर छगन भुजबळांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्रीपद गेलं आणि…”
Deepak Kesarkar on Eknath Shinde
“आम्ही सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंना स्पष्ट सांगितलंय…”, दीपक केसरकरांनी सांगितलं शिवसेनेच्या बैठकीत काय झालं?
Devendra Fadnavis EKnath shinde ajit Pawar
VIDEO : “शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी
Reshma Shinde Gruhapravesh
Video : “पवनने ज्याप्रकारे माझा हात घट्ट…”, रेश्मा शिंदेचा सासरी थाटात गृहप्रवेश! नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Deepak Kesarkar eknath shinde devendra fadnavis
मुख्यमंत्रीपद की गृहमंत्रीपद, शिवसेनेची नेमकी मागणी काय? केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
Girish Mahajan Met Eknath Shinde
Girish Mahajan : सत्तास्थापनेचा तिढा सुटला? गिरीश महाजनांची एकनाथ शिंदेंसोबत सव्वा तास चर्चा; भेटीनंतर म्हणाले, “महायुतीत सगळं…”

हे ही वाचा >> Jitendra Awhad : “पांढरे कपडे सोडून गुलाबी झालेल्या…”; जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडीओ शेअर करत अजित पवारांवर हल्लाबोल

आव्हाड यांनी ही ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर शेअर केल्यानंतर आता यावर राज्य सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले, बदलापूर प्रकरणातील आरोपीला म्हणजेच अक्षय शिंदेला फाशी द्या म्हणून मोर्चा काढणारेही लोक आहेत. एन्काउंटर कधीही मुद्दाम केलं जात नाही. त्या गुन्हेगाराने पोलिसांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या अशा प्रकरणांमध्ये चौकशी केली जाते. या मृत्यू प्रकरणाची देखील चौकशी केली जाणार असून लवकरच सत्य आपल्यासमोर येईल.

पाहा ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलंय >> अक्षय शिंदे चकमकी दरम्यान प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली ऑडिओ क्लिप

पोलिसांकडे प्रतिहल्ला करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता : केसरकर

केसरकर म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत. अक्षय शिंदे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम होता. असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम पोलिसांवरही हल्ले करायला मागेपुढे बघत नाहीत. अशा हल्ल्यांत पोलीस जखमी झाले असतील तर स्वसंरक्षणासाठी प्रतिहल्ला करण्याशिवाय पोलिसांसमोर पर्याय नसतो. पोलीस स्वसंरक्षणासाठी अशी कृती करतात ही वस्तुस्थिती आहे. आता ही कृती योग्य आहे की अयोग्य हे यंत्रणाच ठरवेल. पोलीस तापासानंतर सत्य आपल्यासमोर येईल.

Story img Loader