प्लास्टिकला आधी पर्याय द्या!

अलिबाग व्यापारी असोसिएशनची मागणी

अलिबाग व्यापारी असोसिएशनची मागणी

प्लास्टिक बंदीला विरोध नाही, पण प्लास्टिकला आधी ठोस आणि किफायतशीर पर्याय द्या अशी मागणी अलिबाग व्यापारी असोसिएशननी केली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारयांना यासंदर्भात शुक्रवारी निवेदन सादर करण्यात आले आहे. विविध व्यापारी आणि हॉटेल व्यवसायिक संघटनांचे पादाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्लास्टिक बंदीच्या निर्णयास अलिबाग शहरातील व्यापारी आणि जनतेचा पुर्ण पाठींबा आहे. व्यापारी असोसिएशननी सात ते आठ वर्षांपुर्वीपासूनच शहरातील दुकानामध्यून कॅरीबॅगचा वापर पुर्णपणे बंद केला होता. केवळ किराणा मालाच्या पॅकिंगसाठीच चांगल्या प्रतीच्या पिशव्यांचा वापर केला जात होता. मात्र नगरपालिकेच्या कारवाईत सातत्य न राहिल्याने शहरात प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर पुन्हा सुरु झाला. प्लास्टिक बंदीला आमचा विरोध नाही मात्र कुठल्या प्लास्टिकवर बंदी आहे आणि कुठल्या नाही याबाबत जनसामान्याबरोबरच व्यापारी वर्गात संभ्रमांचे वातावरण आहे.

अशातच आता नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील व्यापारयाविरोधात दंडात्मक कारवाई सुरु झालेल्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे व्यापारयांना शासनाकडून याबाबत तातडीने मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. शासनाच्या आíथक धोरणामुळे छोटे व्यापारी आणि उद्योजक संकटात आहे. महागाई, नोटाबंदी, चलन तुटवडा, जिएसटी कर यामुळे जनतेबरोबरच व्यापारीही अडचणीत सापडले आहेत.

या प्लास्टिक बंदीचा सर्वाधिक फटका छोट्या व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना होणार आहे. अन्यपदार्थ्यांच्या साठवणूकीसाठी प्लास्टीकला ठोस पर्याय अद्यापही दिसून येत नाही. आणि जे पर्याय उपलब्ध आहेत. ते किफायतशीर नाही. त्यामुळे प्लास्टिक बंदी अंमलात आणण्यापुर्वी प्लास्टिकला पर्याय देणे गरजेचे आहे.

बेकरी आणि फरसाण विक्रेत्यांनी खाद्यपदार्थ प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅकींग केले नाही तर दुसरया दिवशी ते खराब होतात. ज्वेलर्सच्या दुकानांमधील चांदीच्या वस्तु प्लास्टिक पिशव्यामध्ये ठेवल्या नाहीत तर त्या काळ्या पडतात.

हॉटेल व्यवसाय, किराणा माल व्यवसाय आणि चिकन मटन तसेच मच्छी विक्रेत्याकडील पदार्थासाठी पॅकींगला पर्याय काय. हे अद्याप स्पष्ट होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाकडून प्लास्टिक बंदी बाबात सविस्तर मार्गदर्शन मिळावे, प्लास्टिकला ठोस आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध व्हावा अशी मागणी यावेळी व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Alibag traders association on maharashtra plastic ban

ताज्या बातम्या