scorecardresearch

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांचे ७ फेब्रवारी रोजी निधन झाले.

shashikant pawar passed away
शशिकांत पवार (फोटो सौजन्य- ट्विटर)

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांचे ७ फेब्रवारी रोजी निधन झाले. त्यांनी मराठा समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. शशिकांत पवार यांच्या निधनानंतर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

कोकणातून परत येत असताना शशिकात पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी प्राणपणाने लढा दिला. मराठा समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.

शशिकांत पवार यांच्या निधनानंतर भाजपाचे खासदार उदयनाजे भोसले यांनी शशिकांत पवार यांच्या निधनाने मराठा समाजाची मोठी हानी झाली असून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर झटणाऱ्या नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 23:38 IST