अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या “जाऊ तिथे खाऊ” या चित्रपटलाही लाजवेल अशी घटना बुलडाणा जिल्ह्यातील झाडेगाव या गावात उघडकीस आली. ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपट आणि यात इतकाच फरक की चित्रपटात विहीर गायब झाली होती आणि इकडे चक्क शौचालयच गायब झालंय. या बाबतीत माध्यमांनी गायब झालेल्या शौचालयाबद्दल ग्रामसेवकाला विचारणा केली, तर त्यांनी सार्वजनिक शौचालय दाखवून माध्यमांची देखील दिशाभूल केली आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगावाचे एकनाथ सोळंके हे लोहार काम करतात. त्यामुळे ते पाल टाकून काम मिळेल त्या गावात लोखंडाची शेती अवजारे बनवतात. त्याच्यावरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. झाडेगावात त्यांचं घरच नाही, म्हणून रस्त्यावर पाल टाकून काही दिवस काढायचे आणि मग कामाच्या शोधात दुसऱ्या गावाला जायचं, असं त्यांचं जीवन सुरू आहे.

yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

“घरच नाही त्याच्या नावावर शौचालय कसं आणि कुठं बांधलं?”

काही दिवसांपूर्वी सोळंके यांना गावातील नागरिकांकडून कळलं की त्यांच्या नावावर शौचालय मागितलं आणि त्याचे पैसेही बँकेतून परस्पर काढून घेतले. म्हणून एकनाथ सोळंके यांनी ग्रामसेवकाला व सरपंचांना विचारणा केली. त्यावर त्यांनी चक्क तुझं शौचालय बांधलं असून तू त्याचा वापर का करत नाही? म्हणून धमकावलं. त्यामुळे ज्या व्यक्तीला घरच नाही, त्याच्या नावावर ग्रामसेवक व सरपंचाने शौचालय कसं आणि कुठं बांधलं? हा प्रश्न विचारला जात आहे. आता याबाबतीत सोळंके यांनी वरिष्ठांकडे तक्रार केलीये.

“कागदोपत्री शौचालय दाखवून पैसे लाटले”

या बाबतीत गावातील काही ग्रामपंचायत सदस्य व वरिष्ठ नागरिकांकडून माहिती घेतली असता एकनाथ सोळंके यांचं या गावात घरंच नसल्याचं समजलं. लाभ दिलेल्या व्यक्तीला पैसे बँक खात्यात जमा करावे असा नियम असतानाही या व्यक्तिच्या नावे कागदोपत्री शौचालय दाखवण्यात आले. तसेच शौचालय न बांधताच परस्पर, सरपंच व ग्रामसेवकाने बँकेतून बेरर चेकच्या माध्यमातून पैसे काढून घेतल्याचं समोर आलं.

अर्ज न करता शौचालय मंजूर, विचारणा केल्यास सरपंचाचा बोलण्यास नकार

या संपूर्ण प्रकाराच्या बाबतीत घर आणि शौचालयाबद्दल विचारलं असता महिला सरपंच मंगला चोपडे कॅमेरासमोर बोलायलाच नकार दिला. त्यांचे पती मध्येच विषयाला बगल देताना आढळले. नंतर ग्रामसेवकाला विचारलं असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. एकनाथ सोळंके यांचं गावात स्वतःचं घर नाही, त्यांनी शौचालयाची मागणीही केली नाही आणि तसा अर्ज देखील त्यांनी दिला नाही. याबाबत विचारताच ग्रामसेवकाची पाचावर धारण बसली.

गावातील अनेकांच्या बाबतीत शौचालय घोटाळा केल्याचा नागरिकांचा आरोप

झाडेगाव ग्रामसेवक जे. ए. पवार यांनी शौचालय बांधलं असून ते दाखवतो म्हणून पत्रकारांना चक्क १ किलोमीटर दूर असलेलं सार्वजनिक शौचालय दाखवलं. तसेच हे शौचालय एकनाथ सोळंके यांचं असल्याचं सांगितलं. बरं हे शौचालय गेल्या २ ते ३ वर्षांपासून बंदच असल्याचं सांगितलं जातंय. असा प्रकार गावातील अनेकांच्या बाबतीत घडलं असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केलाय.

हेही वाचा : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, टीईटी गैरव्यवहारप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

या बाबतीत पुणे येथे ट्रेनिंगसाठी गेलेले जळगाव जामोदचे गटविकास अधिकारी भारसाखळे यांना विचारलं असता त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करू अशी माहिती फोनवरून दिली. मात्र, वरिष्ठांना हा अशा प्रकारचा घोटाळा माहीत नाही यावर नागरिकांचा विश्वास बसत नाहीये. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी आणि शौचालय चोरणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी तक्रारदार एकनाथ फकीरा सोळंके, ग्रामपंचायत सदस्य अजाबराव आगरकर, गावातील जेष्ठ नागरिक रमेश पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.