अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कसारे गावच्या सरपंचांना जातीवाचक शिवीगाळ करत चक्क चपलेचा हार घातल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्याच्या कसारे गावात ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. यात आरक्षण सोडतमध्ये सरपंचपद अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव होते. यात महेश अण्णासाहेब बोराडे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. परंतु नवनिर्वाचित सरपंच काही कामासाठी तालुक्याला जात असताना रस्त्यातच त्यांची गाडी थांबवून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच चपलेचा हार गळ्यात टाकून अनुसुचित जातीच्या सरपंचाचा असाच सत्कार झाला पाहिजे, असं म्हटल्याचा आरोप सरपंच बोराडे यांनी केलाय.

कसाऱ्याचे सरपंच महेश अण्णासाहेब बोराडे म्हणाले, “मी मुलीला दवाखान्यात घेऊन जात असताना मच्छिंद्र कार्ले यांनी गाडी अडवत हात धरला. त्यानंतर कृष्णाची कार्ले यांनी माझ्या गळ्यात चपलाचा हार टाकला. यावेळी माझी बहिण सोडवण्यासाठी आली असता तिला लोटून देत धक्काबुक्की केली. तसेच अनुसुचित जातीच्या सरपंचाचा सत्कार असाच केला पाहिजे असं म्हटलं.”

nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
domestic gas in Panvel
पनवेलमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या

“पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला गेलो तर ५ तास बसवून ठेवलं”

“आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला गेलो तर तिथं आम्हाला ५ तास बसवून ठेवण्यात आलं. दुपारी गेलेलो असताना अखेर सायंकाळी ७ वाजता आमची तक्रार नोंदवून घेतली. यावेळी माझ्यावर आरोपींच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला,” असा आरोप बोराडे यांनी केला. याआधी गावात अनुसुचित जातीचा सरपंच नव्हता. यावेळी आरक्षण असल्यानं मी सरपंच झालो, मात्र हे या जातीवादी लोकांना सहन झालं नाही. त्यामुळेच आम्हाला त्रास दिला जातोय, असा आरोप बोराडे यांनी केलाय.

“पोलीस स्टेशनबाहेर हुसकावून देण्यात आलं”

सरपंच बोराडे यांची बहिण कोमल चंद्रशेखर पारखे म्हणाल्या, “ही घटना घडल्यानंतर आम्ही तक्रार देण्यासाठी दुपारी १ वाजता पोलीस स्टेशनला गेलो, मात्र ५-६ तास बसूनही आमची तक्रार घेतली नाही. जेव्हा आरोपी पोलीस स्टेशनमध्ये आले तेव्हा सायंकाळी ७ वाजता आमची तक्रार नोंदवण्यात आली. त्याआधी आम्हाला पोलीस स्टेशनबाहेर हुसकावून देण्यात आलं. माझा भाऊ सरपंच झाल्यापासून मागील ८ महिन्याच त्यांनी खूप त्रास दिला, पण भावाने घरात हे सांगितलं नाही. आता आम्हाला या प्रकरणात न्याय हवा आहे.”

हेही वाचा : वीज भवनला कुलूप लावून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले

“आरोपींनी आमच्यावर लुटमारीचा खोटा गुन्हा दाखल केला”

“आरोपींनी आमच्यावर खोटा लुटमारीचा, दरोडा टाकल्याचा खोटा गुन्हा दाखल केला. आम्ही असं कोणतंही कृत्य केलेलं नाही. त्यांनी आमच्यावर २ तोळ्याची पोत चोरल्याचा आरोप केला. पण मग घटनेनंतर हे ७ तास घरात का बसले? हे पोलीस स्टेशनला गेले नाही. आम्ही यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी देखील या आरोपींना पाठिशी घातलं आहे,” असा आरोप कोमल पारखे यांनी केलाय. दरम्यान, या घटनेचा विविध संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय.