रायगड जिल्ह्यात पेणमध्ये पोलिसाकडूनच विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. त्याने पेण येथील एका विवाहित महिलेला पती आणि मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत २०१५ पासून शारीरिक संबंध ठेवले. त्याने वारंवार धमकी देऊन वेळोवेळी शरीरसंबध ठेवले. तसेच पीडित महिलेलाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

आरोपीला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३७६(१)अ, ब, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक घाडगे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.

गुन्हा दाखल झाल्याने आरोपी पोलीसाचा पालीस ठाण्यात राडा

दरम्यान, बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने पेण पोलीस ठाण्यात जोरदार राडा केला. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करून हाताबुक्याने तसेच लाथांनी मारहाण केली. वैद्यकीय तपासणीसाठी नेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याने मारहाण केली.

हेही वाचा : सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप, पीडित मुलीला २ लाखांच्या भरपाईचे कोर्टाचे आदेश

या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, कामावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे यासह इतर आरोपांखाली भा.दं.वि कलम ३५३,३३२,५०४,५०६ अन्वये तसेच दारूबंदी अधिनियम कलम ८५(१) ब अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegations of rape on a married woman by police employee in pen raigad pbs
First published on: 03-01-2022 at 20:02 IST