आज राज्यभरामध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे शिवसेनेकडून राज्यतील वेगवेगळ्या भागांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असताना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही मोठ्या उत्साहाने राज्यभरात शिवजयंती साजरी केली जातेय. मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यास विरोध केलाय. या विरोधाला मनसेचे नेते अमेय खोपर यांनी विरोध केलाय. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील हा शाब्दिक वाद अगदी एकमेकांची अक्कल काढण्यापर्यंत गेला.

अमोल मिटकरी यांनी शिवजयंती ही १९ फेब्रुवारीलाच साजरी झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. रोज होत असली तरी हरकत नाही पण तिथीनुसार साजरी होताना दिसतेय यामध्ये व्होट बँकचं राजकारण दिसतंय, असं मिटकरी यांनी म्हटलं. यावर अमेय खोपकर यांनी, “मी मिटकरींच्या वक्तव्यांना फारसं महत्व देत नाही. आजचा दिवस सण साजरा करण्याचा आहे. मिकटरींनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. आपण दरवर्षी दिवळी, गणपती आणि हिंदू धर्माचे सण साजरे करतो ते तारखेनुसार साजरे करत नाही. महाराष्ट्रातील नव्हते, देशातील नव्हे जगातील सर्व लोकांसाठी छत्रपती शिवाजी महारांची जयंती हा एक सण आहे. आम्हीही तो सण म्हणूनच साजरा करतो,” असं सांगितलं. तेव्हा अमोल मिटकरी यांनी, “त्यांचा वाढदिवस ते तिथीप्रमाणे साजरा करतात का विचारा,” असं वक्तव्य केलं.

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

“३६५ दिवस शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे,” असं वक्तव्य अमेय खोपर यांनी केलं. त्यानंतर मिटकरी यांनी वाढदिवसासंदर्भातील प्रश्न विचारल्याचं लक्षात आल्यावर खोपकर यांनी, “राहिला प्रश्न माझ्या वाढदिवसाचा तर माझा वाढदिवस म्हणजे सण नसतो. मिटकरी उगाचं फालतू राजकारण करु नका. तुम्हाला घाणेरडी सवय आहे. दरवेळी काहीतरी फालतू राजकारण करता. उगाच काहीतरी वक्तव्य करायचं, राजकारण कराचं आणि प्रसिद्धीमध्ये राहायचं,” असा टोला मिटकरींना लागवला.

“नीट बोला नीट, मी फालतू वक्तव्य करत नाही,” असं उत्तर मिटकरी यांनी खोपकरांच्या टीकेला दिल्यानंतर खोपकर यांनी, “गप्प बसा हो तुम्ही. तुम्हाला काही अक्कल आहे का?,” असं म्हटलं. “तुम्ही हुकूमशाहा आहात का? मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे,” असं मिटकरींनी म्हटल्यावर खोपकर यांनी, “हे तुमचं दरवेळेचं आहे,” असं म्हणत निशाणा साधला. “फालतू तुम्ही आहात. तुम्हाला अक्कल पाहिजे. स्वत:ला शिवभक्त म्हणवता तुम्ही,” असं म्हणत खोपकर यांनी संताप व्यक्त केला.

“अक्कल कोणाची काढता? तुम्हाला अक्कल आहे का? मी टीव्हीवर सभ्यता सोडून बोलेलो नाही. शिवजयंती साजरी करताय तुमची आहे का ताळ्यावर अक्कल?,” असा प्रश्न मिटकरींनी विचारला.

“छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही केली ती १९ फेब्रुवारीला साजरी. असं का बोलताय? हे शिकवलं आहे का शिवाजी महाराजांनी?,” असा प्रश्न पुढे बोलताना मिटकरींनी विचारला. त्यावर “हा सण आहे, आम्ही सणासारखा साजरा करणार,” असं खोपकर म्हणाले. त्यावर “मग करा ना साजरी. तुम्हाला असं बोलायला शिकवलंय का? मी साधा प्रश्न विचारला तुम्ही तुमचा वाढदिवस तिथीनुसार साजरा करता का?” असं मिटकरी म्हणाले. “तुमच्या पक्षाचा वर्धापन दिन तरी तिथीनुसार साजरा होतो का? आणि आम्हाला राजकारण करायचं नाही सांगता तुम्ही,” असंही मिटकरी म्हणाले. त्यावर खोपकर यांनी, “तुम्हाला काय शिकवण दिलीय दिसतंय. आहो मी एवढा मोठा नाहीय ओ. महाराज आपल्यासाठी दैवत आहे,” असं म्हटलं. “तुमची अक्कल किती आहे मला माहितीय. माझी अक्कल काढू नका. अक्कल नाही काढायची. मला एवढचं उत्तर पाहिजे होतं,” असं मिटकरी म्हणाले.

“आमचं पण दैवत आहे शिवाजी महाराज. तुम्ही ठेका घेतलाय का शिवाजी महाराजांचा?”, असा प्रश्न मिटकरींनी विचारला. त्यावर “तुम्हाला कळलं पाहिजे शिवाजी महाराज दैवत आहे ते. तुम्ही माझ्या वाढदिवसावर कुठे गेलात?,” असा प्रतिसवाल केला.

त्यानंतर मिटकरी यांनी आता कॅमेरावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा संपूर्ण महाराष्ट्राला लाइव्ह सांगा असं आव्हान खोपकर यांना केलं. त्यावर खोपकर यांनी थोड्यावेळात लाइव्ह बघा आमचा कार्यक्रम असं उत्तर दिलं. “सांगा ना पाठ नाही म्हणून. माझी अक्कल काढतायत. तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे मला,” असं मिटकरी म्हणाले. “तुम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. कसल्या गोष्टीवर राजकारण करताय, लाज वाटली पाहिजे तुम्हाला,” असं खोपकर म्हणाले.

“महाराष्ट्राने लक्षात ठेवावं ज्यांची राजमुद्रा पाठ नाही ते आमची अक्कल काढतायत,” असं म्हणत मिटकरींनी पुन्हा खोपकरांवर निशाणा साधला. थोड्यावेळात लाइव्ह बघा असं सांगत खोपकर यांनी पुढे बोलण्यास नकार दिला.