शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला बहुतम सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यासाठी उद्या विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. राज्यात या घाडीमोडी घडत असताना उद्धव ठाकरे बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना देतील असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे ही चर्चा सुरु असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. शिवसेना एवढ्या सहज संपणार नाही. आम्ही पुन्हा लढू आणि एक दिवस शिवसैनिकाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करुन दाखवू, असे राऊत म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Maharashtra Political Crisis Live : उद्या बहुमत चाचणी होणार की नाही? थोड्याच वेळात निकाल येण्याची शक्यता! राज्यपालांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू

“उद्धव ठाकरे हे पळपुटे नाहीत. ते आमचे नेते आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्यांच्या पाठीशी महाराष्ट्राच्या भावना आहेत. या भावनेचा आदर ते करतील. शेवटच्या क्षणापर्यंत ते लढत राहतील. ज्यांना ही सत्ता अशा प्रकारे काबीज करायची असेल ते करु शकतात. पण येणारा काळ शिसेनेचा असेल. यातून आम्ही उभे राहू आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये एक शिवसैनिक मुख्यमंत्री होईल. आम्ही जिथे आहोत तिथून लढाई सुरु ठेवू आणि एक दिवस शिवसैनिक मुख्यमंत्री करु,” असे राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीमाना देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

तसेच, “बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशी सहज कोणाला संपवता येणार नाही. सत्तेच्या आणि पैशांच्या बळावर तर नक्कीच नाही. अशी अनेक आव्हाने आणि संकटं पचवून ही शिवसेना मराठी माणसांचे, हिंदुत्वाचे रक्षण करत उभी राहिली आहे. शिवसेना पुन्हा एकदा उभी राहीन,” असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> “माझ्याच लोकांनी दगा दिला”; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना

“उद्या काय व्हायचे ते होईल. सध्या देशाच्या चारही स्तंभाला वाळवी लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राने एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा सुसंकृत असा मुख्यमंत्र अनुभवला, असे मी म्हणेन. सध्या विधानसभेच्या उपाध्यक्षांनी आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे, त्यावर निर्णय होणं गरजेचं आहे. त्यांनी शिवसेना फोडण्याचं जे पाप केलं आहे, ते महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आमदारांना संरक्षण देण्यासाठी बहुमताचा प्रस्ताव मान्य करुन घेण्यासाठी आणि आम्हाला हरवण्यासाठी मुंबईत हजारोंनी सैन्य दाखल झाले. एवढं नराधम कृत्य संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही झालं नाही,” असे म्हणत राऊत यांनी भाजपावर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amid maharashtra political crisis sanjay raut said one day cm will be of shivsena prd
First published on: 29-06-2022 at 20:43 IST