यात्रा व जत्रांना परवानगी कधी? सांस्कृतिक राज्यमंत्री सांगतात…

देशात आणि राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरली असा समज असताना पुन्हा एकदा करोनाचा फैलाव होत असल्याचं चित्र आहे.

Amit-Deshmukh

देशात आणि राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरली असा समज असताना पुन्हा एकदा करोनाचा फैलाव होत असल्याचं चित्र आहे. राज्यात करोना रुग्णसंख्या घटल्यानंतर काही निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली होती. मात्र असं असलं तरी सरकार सावध पावलं टाकताना दिसत आहे. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार नियमांमध्ये बदल केले जात आहेत. अजूनही काही जिल्ह्यांमध्ये करोनाचे कडक निर्बंध लागू आहेत. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या इशाऱ्यानंतर करोनाबाबत उपाययोजना आखल्या जात आहेत. आता सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमूख यांनी यात्रा आणि जत्रांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

“राज्यात करोनाचा धोका कमी झाल्यानंतरच यात्रा आणि जत्रा यांना परवानगी दिली जाईल”, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देखमुख यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी आहे. कोविडचा तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याने सावधगिरी बाळगून हळूहळू राज्यातील यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देणार असल्याचे अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर आणि शिष्टमंडळाला सांगितले.

राज्यात बुधवारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांपेक्षा काही जास्त आढळून आली आहे. दिवसभरात राज्यात ५ हजार ०३१ नवीन करोनाबाधित आढळले असून, ४ हजार ३८० रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, २१६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात बुधवारपर्यंत ६२,४७,४१४ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,३६,६८० झाली आहे. आतापर्यंत राज्यात १,३६,५७१ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amit deshmukh on corona restriction festival yatra and jatra rmt

ताज्या बातम्या