मुंबई : राज्यात कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगासमोरील आर्थिक अडचणींबाबत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिली येथे आज, बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटीराज्यात कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगासमोरील आर्थिक अडचणींबाबत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिली येथे आज, बुधवारी बैठक होणार आहे. ल यांच्यासह अन्य मंत्री दिल्लीला जाणार आहेत.

केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातल्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. २०१९ मध्ये साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) ३१ रुपये प्रति किलो निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर २०२६ पर्यंत एमएसपीमध्ये कोणतीही वाढ झाली नाही. पण, २०१९ मधील २,७५० रुपये प्रति टन असलेली एफआरपी वाढून २०२६ मध्ये २९.१० टक्क्यांनी वाढून ३५५० रुपयांवर गेली आहे. साखरेचा दर २०१९ पासून स्थिर आणि एफआरपीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने उद्योगाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यासह इथेनॉलच्या खरेदी दरातही अपेक्षित वाढ झाली नाही. इथेनॉल प्रकल्प आणि प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला देण्यात येणाऱ्या व्याज सवलत, अनुदानेही १७. ११ कोटी रखडले आहेत. या सर्व विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.

कांदा प्रश्न केंद्र सरकारच्या कोर्टात

राज्यात कांदा दराचा प्रश्न चिघळला आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला एक रुपये, सव्वा रुपये प्रति किलो दर मिळत आहे. कांदा दराच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीने या प्रश्नी मंगळवारी चांदवड येथे मोर्चा काढल्यामुळे कांद्याच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाफेड, एनसीसीएफकडून फक्त दोन लाख टन खरेदी होणार आहे. खरेदी गतवर्षीच्या तुलनेत कमी आणि कमी दराने होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या प्रश्नावरही शहा यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे.

देशाची खरीप आढावा बैठक आजपासून

संपूर्ण देशाच्या खरीप हंगामाची आढावा बैठक केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही बैठक दोन दिवस चालणार असून, बैठकीला विविध राज्यांचे कृषिमंत्री आणि संबंधित वरीष्ठ अधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.