Amit Shah in Shirdi Adhiveshan : भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे होत आहे. या अधिवेशनातून भाजपाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं जात असून विरोधकांवर निशाणा साधला जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हा मोठा कार्यक्रम होत असल्याने राज्यभरातील भाजपाचे बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहत कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षावरही निशाणा साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित शाह म्हणाले, “महाराष्ट्राच्या महाविजयानंतर आपण पहिल्यांदा एकत्र आलो आहेत. तुम्ही (कार्यकर्त्यांनी) किती मोठं काम केलंय याची तुम्हाला कल्पना नाही. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले. अनेक कार्यकर्ते आमदार आणि मंत्री झाले. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडलं होतं. दगफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली.”

हेही वाचा >> Ashish Shelar : “तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नही…”, आशिष शेलारांचा शेरोशायरीतून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला स्थिर सरकार दिलं

“१९७८ ते २०२४ महाराष्ट्रात अस्थिरतेची स्थिती होती. अस्थितरता सोडून स्थिर राष्ट्र बनवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. लोकसभेनंतर आमचा विजय होईल, असं विरोधकांचा स्वप्न होतं. पण त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचं काम तुम्ही केलं. काही निवडणुका अशा असतात की त्या देशाचं राजकारण बदलतात. महाराष्ट्राचे शिल्पकार भारताचे जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत”, असंही अमित शाह म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah in shirdi bjp adhiveshan criticise sharad pawar and uddhav thackeray sgk