Amit Shah Visit Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ते रविवारी मुंबईत दाखल झाले. आज अमित शाह लालबागच्या राजाचं राजाचे दर्शन घेणार आहेत. त्याआधी ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन अमित शाह यांनी बाप्पांचे दर्शन घेतले आहे. दरम्यान, अमित शाह रविवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी मातृभाषेबाबत महत्वाचं भाष्य केलं. ‘घरात मातृभाषेमधून बोललं पाहिजे असं आवाहन करत बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं अशी मागणी करण्यांमध्ये मी देखील होतो’, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

अमित शाह काय म्हणाले?

“माझ्या घरातही दोन माझे नातवडं आहेत. त्यांनी संस्कृत किंवा गुजराती भाषा शिकावी, यासाठी मी त्यांना वेळ देतो. तसेच त्यांच्या शाळेत जाऊनही चर्चा करत असतो. त्यांच्या शाळेचे शिक्षक भाषा आणि भाषेचं व्याकरण व्यवस्थित शिकवतात की नाही हे देखील पाहत असतो. मी आपल्या सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की, कमीत कमी आपल्या घरात तरी आपल्या मातृभाषेतून बोला. त्यामुळे आपल्या मातृभाषेला आपली मुले पुढे घेऊन जातील. अन्यथा एक दिवस असा येईल की देशात आपल्याला मोठ्या संख्येने वृद्धाश्रम काढण्याची वेळ येईल. याचं कारण म्हणजे घरामध्ये नातू मातृभाषेत बोलले नाही तर नातवाचं आणि आजोबाचं नातं कसं जोडणार? त्यामुळे मातृभाषा बोलणं गरजेचं आहे”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
temple painting scenery in ganeshotsav pandals in mumbai this year
यंदा मुंबईतील गणेशोत्सवात मंदिरांचे दर्शन
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार की नाही? भुजबळांचं सूचक विधान; म्हणाले, “आमच्या ग्रुपचे कॅप्टन…”

हेही वाचा : भाजपाला हरियाणात मोठा धक्का, प्रदेश उपाध्यक्षांनीच काँग्रेसची वाट धरली!

बॉम्बे नाही तर मुंबई नाव असावं

गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “मुंबईसाठी ज्या लोकांनी आंदोलन केलं, मुंबई हेच नाव हवं, अशी मागणी ज्या लोकांनी केली होती, त्यामध्ये मी देखील होतो. तेव्हा बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं, अशी मागणी मी देखील केली होती”, असं यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.

मातृभाषा सक्तीची करणार

“आता यापुढे जे नवीन शैक्षणिक धोरण येईल, त्यामध्ये आम्ही मातृभाषा सक्तीची करणार आहोत. मग या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध देखील होऊ शकतो. हे देखील आम्हाला माहिती आहे. मात्र, तरीही आम्ही हा निर्णय घेणार आहोत”, असंही गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं.