Amit Thackeray Love Story : निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या अमित ठाकरेंबरोबर त्यांची पत्नी मिताली ठाकरेही जागोजागी दिसतेय. माहीम विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यात मिताली ठाकरे यांचाही हातभार आहे. घरोघरी जाऊन त्याही अमित ठाकरेंना मतरुपी आशीर्वाद मागत आहेत. राज्यातील राजकारणातील या जोडप्याची ओळख कुठे अन् कशी झाली? त्यांच्या ओळखीचं रुपांतर लग्नापर्यंत कसं पोहोचलं, याविषयी अमित ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते अथर्व सुदामे या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

निवडणुकीच्या प्रचारात मिताली ठाकरेंचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचं अमित ठाकरे म्हणाले. तसंच, सासू सासऱ्यांसह आई वडील निवडणुकीच्या प्रचारात असल्याने त्यांचं १०० टक्के सहकार्य असल्याचं अमित ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी त्यांच्या लव्हस्टोरीविषयी सांगितलं. मुंबईतील दोन प्रसिद्ध कॉलेजमधील दोन विद्यार्थ्यांची ओळख कशी झाली, ओळखीचं रुपांतर मैत्रीत अन् मैत्रीचं रुपांतर प्रेमात कसं झालं, फुटबॉल त्यांच्यामधील दुवा कसा बनला या गुपिताविषयी अमित ठाकरेंनी सांगितलं आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >> Amit Thackeray : “मला वाटलेलं मिताली…”, निवडणुकीच्या प्रचाराबाबत अमित ठाकरे पत्नीच्या पाठिंब्याविषयी काय म्हणाले?

आमची स्टोरीही इंटरेस्टिंग आहे, असं अमित ठाकरे म्हणाले. “मी पोद्दारचा आणि ती रुईयाची आहे. कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्राने मला मिताली दाखवली. चेल्सीची काळी लॅम्पर्डची जर्सी घालून ती उभी होती. ती चेल्सी फॉलोव्हर आहे. तिला पाहताच तिच्यावर प्रेम जडलं”, असं सांगत अमित ठाकरेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

ते पुढे म्हणाले, “मी शाळा – कॉलेजमध्ये मुलींशी बोलत नव्हतो. मुलींशी बोलायला मी लाजायचो. मला त्यांच्याशी बोलताच यायचं नाही. पण कॉलेजमध्ये अफवा पसरली की ती मला आवडायला लागली आहे. तिच्या कॉलेजमध्येही असं पसरलं की तिच्या मागे राज ठाकरेंचा मुलगा लागला आहे. त्याचवेळी तिलाही एक मुलगा आवडायचा. त्यामुळे ती त्याला बघायला जायची. रुईयाच्या ग्राऊंडवर तो फुटबॉल खेळायचा. नंतर तिला कळलं की जी अफवा पसरली आहे की राज ठाकरेंचा मुलगा तिच्या मागे आहे, हा तोच आहे ज्याला ती बघायला जातेय. तिला राज ठाकरे माहीत होते पण त्यांचा मुलगा कोण हे माहीत नव्हतं” असं अमित ठाकरे म्हणाले.

“मीच तिला मोबाईलवरून प्रपोज केलं. २००९ ला आमची ओळख झाली. २०१७ ला साखरपुडा झाला आणि २०१९ ला लग्न झालं. आज आम्ही १५ वर्षे एकत्र आहोत”, असंही अमित ठाकरेंनी सांगितलं.

Story img Loader