Amit Thackeray on Mitali Thackeray : महाराष्ट्रात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय. विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. दारोदारी जाऊन मतदानासाठी आवाहन करणे, प्रचारसभांमध्ये विरोधकांवर टीका करणे तर माध्यमांना मुलाखती देण्याचा धडाका सुरू आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजपुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचं ते म्हणाले. त्यांनी अथर्व सुदामे या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या पत्नीकडून मिळत असलेल्या सहकार्याविषयी सांगितलं.

“निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्याकडून अविश्वसनीय मदत मिळतेय. मितालीकडून मला अपेक्षित नव्हतं. तीन साडेतीन लाख लोकसंख्या आहे. सर्वांच्या घरी पोहोचणं कठीण आहे. मला वाटलेलं मिताली एक-दोन दिवस येईल. पण ती दररोज माझ्याबरोबर असते. रोज विचारते कधी निघायचं. तिचा जो पाठिंबा आहे, त्याशिवाय मी करू शकलो नसतो”, असं अमित ठाकरे म्हणाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >> ‘त्या’ युवराजाला जनता कंटाळली, आता हा ‘राज’पुत्र काय करणार?, सदा सरवणकरांच्या मुलीची दोन्ही ठाकरेंवर जोरदार टीका

प्रचारात सासू सासऱ्यांचाही पाठिंबा

त्यांनी पुढे त्यांच्या सासू सासऱ्यांच्या पाठिंब्याविषयीही सांगितलं. ते म्हणाले, “माझी आई प्रचारात उतरली आहे. सासरे सर्जन असूनही ते सर्व कामे सडून प्रचारात उभे असतात. माझी सासू माझ्या आईबरोबर असते. कुटुंबाचा पाठिंबा १०० टक्के आहे. तर उर्वशी माझ्या बाबांना प्रचारात मदत करतेय”, असं अमित ठाकेर म्हणाले.

अमित ठाकरे अन् मिताली ठाकरेंची लव्ह स्टोरी काय?

अमित ठाकरे यांनी याच मुलाखतीत त्यांची लव्ह स्टोरीही सांगितली. ते म्हणाले, “मी पोद्दारचा आणि ती रुईयाची आहे. कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्राने मला मिताली दाखवली. लॅम्पर्डची जर्सी घालून ती उभी होती. ती चेलसी फॉलोव्हर आहे. तिला पाहताच तिच्यावर प्रेम जडलं”, असं सांगत अमित ठाकरेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

ते पुढे म्हणाले, “मी शाळा – कॉलेजमध्ये मुलींशी बोलत नव्हतो. मुलींशी बोलायला मी लाजायचो. मला त्यांच्याशी बोलताच यायचं नाही. पण कॉलेजमध्ये अफवा पसरली की ती मला आवडायला लागली आहे. तिच्या कॉलेजमध्येही असं पसरलं की तिच्या मागे राज ठाकरेंचा मुलगा लागला आहे. त्याचवेळी तिलाही एक मुलगा आवडायचा. त्यामुळे ती त्याला बघायला जायची. रुईयाच्या ग्राऊंडवर तो फुटबॉल खेळायचा. नंतर तिला कळलं की जी अफवा पसरली आहे की राज ठाकरेंचा मुलगा तिच्या मागे आहे, हा तोच आहे ज्याला ती बघायला जातेय. तिला राज ठाकरे माहीत होते पण त्यांचा मुलगा कोण हे माहीत नव्हतं” असं अमित ठाकरे म्हणाले.

“मीच तिला मोबाईलवरून प्रपोज केलं. २००९ ला आमची ओळख झाली. २०१७ ला साखरपुडा झाला आणि २०१९ ला लग्न झालं. आज आम्ही १५ वर्षे एकत्र आहोत”, असंही अमित ठाकरेंनी सांगितलं.

Story img Loader