scorecardresearch

बेळगावबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी केली दिलगिरी व्यक्त; म्हणाले…

“माझी काय भूमिका आहे, ते आजतागायत सर्वांना…”

amol kolhe
अमोल कोल्हे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला आहे. या वक्तव्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. तसेच, सीमाभागातून अमोल कोल्हेंबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यानंतर अमोल कोल्हेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्याकडून अनावधानाने बेळगावचा उल्लेख बेळगावी असा झाला, असं स्पष्टीकरण कोल्हेंनी दिलं आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, “येत्या पाच तारखेला बेळगावच्या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे, असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे या कार्यक्रमाला येत होतो. पण, निपाणीमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याला जात असताना, घाईत या कार्यक्रमाबद्दल बोलताना बेळगावचा माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला. याबाबत मराठी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील. त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.”

हेही वाचा : “एका महिलेने चिंचवडमध्ये पाडलं”, निलेश राणेंची अजित पवारांवर बोचरी टीका; अमोल मिटकरी प्रत्युत्तर देत म्हणाले, “एखादं वराह…”

“माझी काय भूमिका आहे, ते आजतागायत सर्वांना माहिती आहे. मी आजही त्या भूमिकेवर ठाम आहे. सीमाभागात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा राहतोय, म्हणून या कार्यक्रमाला येण्याचं कबूल केलं होतं. यात बेळगावचा माझ्याकडून अनावधानाने, घाईत चुकीचा उल्लेख झाला. आपल्या भावना दुखावल्याबद्दल सर्वांची माफी मागतो,” असं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 10:45 IST