सीमाभागातील मराठी बांधव गेल्या अनेकवर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, अशावेळी सीमाभागातील बांधवांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची हीच वेळ आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेश सुरु झाले आहे, त्यासाठी अमोल कोल्हे दिल्लीत दाखल झाले असून सीमावादाचा मुद्दा संसदेतही मांडणार असल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा,” धनंजय महाडिकांचा कर्नाटकच्या नागरिकांना इशारा; म्हणाले “अशी गुंडगिरी…”

काय म्हणाले अमोल कोल्हे?

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशात बेळगावजवळील हिरेबागवाडी येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काल महाराष्ट्रातील गाडींवर जो हल्ला करण्यात आला, त्याचा मी निषेध करतो. पुढच्या वर्षी कर्नाटकमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जर हे सर्व प्रकार घडत असतील, तर हे दुर्देवी आहे. याविरोधात महाराष्ट्राने आपला आवाज बुलंद करायला हवा”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – ‘शिंदे सरकार नामर्द आहे’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “जेलमध्ये राहिल्याने…”

“सीमाभागातील मराठी बांधव गेल्या अनेकवर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. सातत्याने त्यांच्या भाषिक अत्याचार सुरू आहे. अशावेळी सीमाभागातील बांधवांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची वेळ आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

हेही वाचा – राऊतांच्या ‘नामर्द सरकार’ टीकेवर सुधीर मुनगंटीवार यांचे जशास तसे उत्तर, म्हणाले “स्वत:ला उपमा देण्याचे…”

दरम्यान, “हा मुद्दा संसदेतही मांडला जाईल. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी हौतात्म पत्करले, त्यापैकी अनेक जण सीमा भागातले होते. महाराष्ट्रात येण्यासाठी येथील मराठी बांधव कित्येक वर्षांपासून लढत आहेत. त्यांच्या भावना समजून घेतली पाहिजे”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol kolhe reaction on maharashtra karnatk border issue said he will raised issue in parliament spb
First published on: 07-12-2022 at 13:28 IST