शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आज खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपामध्ये गृह, वित्त, जलसंपदा, सहकार अशी खाती भाजपाकडे सोपवण्यात आली आहेत. याच कारणामुळे विरोधकांनी या खातेवाटपावरून भाजपा आणि शिंदे गटावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तर शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली असून मंत्र्यांना मविआ सरकारमधे असलेला सन्मान आता कमी झाला आहे का? असा सवाल केला आहे.

हेही वाचा >>> मोठी बातमी! एकनाथ शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण यादी!

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
pankaja munde
मोले घातले लढाया: ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यां’ची रवानगी दिल्लीत !

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली आहेत. गृह, अर्थ, महसूल, वने, ग्रामविकास, सहकार, जलसंपदा व सर्व महत्त्वाची खाती भाजपाने आपल्याकडेच ठेवून शिंदे गटाला दुय्यम स्थान दिले आहे. शिंदे गटातील मंत्र्यांना मविआ सरकारमधे असलेला सन्मान आता कमी झाला?” असे म्हणत मिटकरी यांनी शिंदे गट आणि भाजपावर खोचक टीका केली आहे.

हेही वाचा >>> वेगवेगळे आरोप झालेले संजय राठोड, अब्दुल सत्तार यांच्याकडे मोठी जबाबदारी, शिंदे सरकारमध्ये मिळाली ‘ही’ महत्त्वाची खाती

“केसरकरांना हवेहवेसे वाटणारे पर्यटन खाते मंगल प्रभात लोढांकडे देऊन फडणवीस यांनी नवा इतिहास रचला हे. तसेच महिला व बालकल्याण सुद्धा त्यांच्याकडेच दिल्याचा पराक्रम केला आहे,” असे म्हणत मिटकरी यांनी केसरकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरपूस टीका केली आहे.

हेही वाचा >>> राज्याच्या तिजोरीच्या चाव्या देवेंद्र फडणवीसांकडे, गृहमंत्रीपदही सांभाळणार

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाची खाती

राज्य मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये भाजपाचे ९ आणि शिंदे गटातील ९ अशा एकूण १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अद्याप हे सर्व नेते कोणत्याही खात्याविना मंत्री होते. असे असताना आज या मंत्र्यांना खातेवाटप झाले आहे. यामध्ये महत्त्वाची खाती भाजपाला देण्यात आली आहेत. यातही सर्व महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवली आहेत. त्यांच्याकडे वित्त व नियोजन, गृहखाते, गृहनिर्माण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार अशी एकूण ८ खाती आहेत.

एकनाथ शिंदेंकडे १४ खाती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडे एकूण १४ खाती ठेवली आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग अशी एकूण १४ खाती शिंदे यांच्याकडे आहेत.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील –

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार-

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील-

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित-

आदिवासी विकास

गिरीष महाजन-

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण</p>

गुलाबराव पाटील-

पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे-

बंदरे व खनिकर्म

संजय राठोड-

अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे-

कामगार

संदीपान भुमरे-

रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत-

उद्योग

प्रा.तानाजी सावंत-

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण –

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार-

कृषी

दीपक केसरकर-

शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे-

सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई-

राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा-

पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास