राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे माणसं पाहूनच वेळ देतात, असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. “चंद्रकांत पाटील यांचे अलिकडे काही वैफल्यग्रस्त विधानं येत आहेत. ते सध्या काहीही गप्पा करतात, काहीही बोलतात. त्यामुळे अशा निरर्थक व्यक्तींना वेळ देऊन अजित पवार यांना प्रशासकीय वेळ वाया घालवायचा नसेन,” असंही मिटकरी यांनी म्हटलं. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

अमोल मिटकरी म्हणाले, “काही लोकांच व्यथा आहे की आम्हाला विश्वासात घेत नाही. मला वाटतं अजित पवार यांचा जेवढा राजकीय अनुभव आहे तो पाहता कोणत्या माणसाला किती वेळ द्यायचा हे त्यांना माहिती आहे. चंद्रकांत पाटील कितीवेळी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे जातात आणि त्यांच्याशी बोलतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल, मात्र चंद्रकांत पाटलांना किती वेळ द्यावा हे अजित पवार यांना माहिती आहे.”

Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Baban Gholap
शिंदे गटात प्रवेश करून बबन घोलप यांनी काय साधले ?
ravi rana bachchu kadu
“बच्चू कडूंसमोर हात जोडून विनंती करतो…”, पत्नीला लोकसभेची उमेदवारी मिळताच रवी राणा नरमले?
Eknath Shinde slams Uddhav Thackray on Narendra Modi
पंतप्रधान मोदींना औरंगजेबाची उपमा, मुख्यमंत्री शिंदेंचा संताप; म्हणाले, “ज्याने स्वतःच्या भावाला..”

“निरर्थक व्यक्तींना वेळ देऊन अजित पवार यांना प्रशासकीय वेळ वाया घालवायचा नसेन”

“चंद्रकांत पाटील यांचे अलिकडे काही वैफल्यग्रस्त विधानं येत आहेत. ते सध्या काहीही गप्पा करतात, काहीही बोलतात. त्यामुळे अशा निरर्थक व्यक्तींना वेळ देऊन अजित पवार यांना प्रशासकीय वेळ वाया घालवायचा नसेन. शेवटी ते म्हणतात भिंतीला सांगायचं का? मराठीत एक म्हण आहे की भिंतीलाही कान असतात. त्याचप्रमाणे अजित पवार यांचे कान जेवढे तीक्ष्ण आहेत, तेवढीच नजरही तीक्ष्ण आहे,” असं मिटकरी यांनी सांगितलं.

“अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कुठे जातो, कुठे बसतो याची सर्व कुंडली”

अमोल मिटकरी पुढे म्हणाले, “पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कुठे जातो, कुठे बसतो, कोणत्या हॉटेलमध्ये असतो काय काय करतो ही सर्व कुंडली अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याबाबतीत बोलताना जरा जपून आणि सांभाळून बोलावं.”

हेही वाचा : “मला तिथं ‘डाऊट’ होताच आणि तिथं…”, पुणे जिल्हा बँक निवडणुकीत वर्चस्व, मात्र ‘या’ एका जागेवरील पराभव अजित पवारांच्या जिव्हारी

“अजित पवार यांना जेवढा प्रशासकीय अनुभव आहे तेवढा यायला तुम्हाला अनेक वर्षे खपावं लागेल. मात्र, कोणाला किती वेळ द्यायचा याचं नियोजन अजित पवार यांच्याकडे असतं. त्यामुळे व्यक्ती पाहूनच अजित पवार वेळ देत असतात, हे सूर्याइतकं स्पष्ट आहे,” असंही अमोल मिटकरी यांनी नमूद केलं.