उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे. अमृता फडणवीसांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करून ब्लॅकमेल करण्यात येत होतं, असा आरोप अमृता फडणवीसांनी तक्रारीत केला.

अमृता फडणवीसांनी तक्रार दाखल केल्यानंतर मलबार हिल पोलिसांनी डिझायनर आणि संशयित आरोपी अनिक्षा जयसिंघानीला उल्हासनगर येथील घरातून अटक केली. याप्रकरणी पोलीस अनिक्षाची चौकशी करत आहेत. या संपूर्ण घटनाक्रमानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय
Jayant Patil On Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बारामतीकर त्याच पद्धतीने…”
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Sharmistha Mukharjee and Arvind Kejriwal arrest
“कर्माची फळं…”, प्रणव मुखर्जींच्या मुलीचा केजरीवालांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “अण्णा हजारे गँग…”

हेही वाचा- शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपानंतर राज्य सरकारचा तोडगा; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

विद्यमान गृहमंत्र्याच्या पत्नीच्या संदर्भात चौकशी सुरू आहे, त्यामुळे नैतिकता दाखवत, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. त्यांनी एक ट्वीट करत ही मागणी केली. या ट्विटबरोबर त्यांनी महाविकास आघाडीच्या काळातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची प्रतही जोडली आहे.

हेही वाचा- “शिवसेना भवनावर चाल करून येणाऱ्या गद्दारांना…”, ही धमकी समजा म्हणत संजय राऊतांचं मोठं विधान!

सुषमा अंधारे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या, “माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्याविरोधात चौकशी चालू असताना निष्पक्ष चौकशी व्हावी, या हेतूने नैतिकता म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता जर विद्यमान गृहमंत्र्याच्या पत्नीच्या संदर्भात चौकशी चालू असेल तर अशीच नैतिकता दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायलाच हवा.”