राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पक्षचिन्ह तसेच खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या कामकागाजाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण न्यायव्यवस्थेच्या निर्णयाचा मान ठेवला पाहिजे. आता निवडणूक आयोग काय निर्णय देतो हे पाहुया, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>> “हा शिवसेनेला धक्का का मानावा? निवडणूक आयोग..”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेची भूमिका!

आपल्याला न्यायदेवतेवर सर्वांनाच विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाने खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्यापासून निवडणूक आयोगाला रोखण्यास मनाई केली आहे. आपण या निर्णयाचा आदर केला पाहिजे. आता निवडणूक आयोग काय निर्णय देणार, हे आपण पाहुया, असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

हेही वाचा >>>> SC Hearing over Thackeray vs Shinde Faction Live: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार

अमृता फडणीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरही भाष्य केले. येणाऱ्या महापालिकेत देवाच्या कृपेने काही गोष्टी व्हायच्या असतील तर त्या होणार आहेत मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचा विजय व्हावा, अशी माझी इच्छा आहे. या निवडणुकीमध्ये प्रगतीचे राजकारण असायला हवे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis comment on shiv sena clash supreme verdict prd
First published on: 27-09-2022 at 17:34 IST