माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ना त्या कारणाने चर्चेत असतात. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांवर त्या सातत्याने भाष्य करत असतात. आपल्या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या टिपण्ण्यांची चांगलीच चर्चा होते. आजचं त्यांचं ट्वीटही तसंच आहे. या ट्वीटमधून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांनी काही प्रश्न ट्वीट केले आहेत. ५०-५० मार्कांचे हे दोन प्रश्न अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकारमधल्या काही नेत्यांबद्दलचे आहेत. आपल्या ट्वीटमध्ये अमृता फ़डणवीस म्हणतात, “थोडक्यात उत्तर द्यावे …५० मार्क्स ; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले ….या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स !शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब है और सुनने में आया है _नामर्द है !”

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी पातळी सोडून बोलत असल्याची तक्रार केली आहे. तर “आपण टोकाची राजकीय टिपण्णी करून जनतेचा रोष ओढवून घेऊ नये, समाजोपयोगी कामं करत राहा, राजकीय टिपण्णी करू नये”, असा सल्लाही काही जणांनी दिली आहे. तर काही जणांनी मात्र त्यांच्या या ट्वीटवर समर्थनार्थ कमेंट्स केल्या आहेत.