राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राजकीय क्षेत्रासह कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहिली आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नीबरोबरचा फोटो शेअर करत अमृता यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा!त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे,या शुभकामना!” असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे.

हेही वाचा>> किरण मानेंना लॉटरी लागली! महेश मांजरेकरांबरोबर करत आहेत शूटिंग; सेटवरील फोटो शेअर करत म्हणाले…

अमृता फडणवीस या पेशाने बँकर आहेत. त्यांना गायनाचीही आवड आहे. आजवर अनेक गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचं ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. आज मे मूड बना लिया, शिव तांडव स्रोतम, कुणी म्हणाले या गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती.

हेही पाहा>> CM Eknath Shinde Birthday: ठाण्याच्या चाळीत घर, ४६ लाखांच्या गाड्या अन्…; किती श्रीमंत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

अमृता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा समाजातील विषयांवर त्या परखडपणे सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. अमृता त्यांचे फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करत असतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis wishes cm eknath shinde shared special post on his birthday kak
First published on: 09-02-2023 at 14:23 IST