राज्यामध्ये सत्तापालट घडवणारे शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचा आज स्मृतीदिन. याचनिमित्त शिंदे यांनी सोशल मीडियावरुन दिघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कवितांच्या माध्यमातून विरोधकांना चिमटे काढणाऱ्या शिंदे यांनी आपल्या राजकीय गुरुला आंदरांजली वाहण्यासाठीही चारोळ्यांचा आधार घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिघे यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट केली आहे. “वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघेसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन” या कॅप्शनसहीत मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंना श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट शेअर केली आहे. आपल्या प्रत्येक भाषणामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आनंद दिघेंचा आवर्जून उल्लेख करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी शेअर केलेल्या फोटो पोस्टमध्ये आनंद दिघेंचा फोटो आणि त्याबाजूला चारोळी असल्याचं दिसत आहे.

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Balasaheb Thackeray
‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
sharad pawar, madha lok sabha constituency, ncp, bjp
माढ्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची

ठाणे: उद्धव ठाकरे येण्याचे कळताच शिंदे गटाकडून आनंद आश्रम हायजॅकचा प्रयत्न

तुमची शिकवण माझ्या मनामध्ये कायम कोरलेली असून मी तुमच्याच तत्वाचे आचरण करत आहे. मी जनसेवेचं व्रत हाती घेतलं असून माझ्यासाठी राजकारण महत्त्वाचं नाही अशा आशयाची चारोळी या फोटोवर लिहिलेली आहे. या फोटोवरील चारोळी खालीलप्रमाणे आहे –

उरात भरुनी सदैव आपले स्मरण,
मनामध्ये कोरली आहे कायम आपलीच शिकवण…
करीतो गुरुवर्य आपल्या तत्वांचे आचरण,
जनसेवेचे व्रत महत्त्वाचे, नाही राजकारण…

कसा झालेला आनंद दिघेंचा अपघात

आनंद दिघे हे सण उत्सवांना त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरी आवर्जून जात असतं. असेच ते २४ ऑगस्ट २००१ रोजी कार्यकर्त्यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त भेट देण्यासाठी बाहेर निघाले. याच दरम्यान ठाण्यातील वंदना टॉकीजसमोरील रस्त्यावर त्यांच्या गाडीला भिषण अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले तसेच डोक्यालाही मार लागला. त्यांना तात्काळ सिंघानिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे २६ तारखेला त्यांच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली.

२६ तारखेलाच संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारात त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला. त्यानंतर जवळजवळ दहाच मिनिटांनी त्यांना हृयविकाराचा दुसरा मोठा झटका आला. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले. मात्र अखेर रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेव्हा दिघे यांचे निधन झाले ते अवघे ५० वर्षाचे होते.

“दाऊदच्या गुंडांपासून आनंद दिघेंना वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनात घुसवली होती गाडी”

दिघेंच्या निधनाची बातमी ठाण्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर रागाच्याभरात त्यांच्या १५००  चाहत्यांनी सिंघानिया हॉस्पिटलला आग लावली. या आगीमध्ये एक रुग्णवाहिका आणि २००  बेड जळून खाक झाले. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि नंतर ३४ जणांना अटक करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनीच आनंद दिघेंचे निधन झाल्याचे “आनंद दिघे आपल्यातून गेले,” अशा शब्दांमध्ये जाहीर केलं. आजही ठाण्यामधील शिवसेनेच्या प्रत्येक पोस्टरवर आनंद दिघे यांचा फोटो असतोच.