Anandrao Adsul Angry on BJP over Governor Post : राज्यपालपदासाठी आठ-दहा दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत कौर राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार, असा इशारा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजपाला दिला आहे. अडसूळ म्हणाले, "नुकतीच राष्ट्रपती कार्यालयाने नव्या राज्यपालांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. यात आठ ते दहा जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये कुठेही माझं नाव नाही. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. त्यांना आठवण करून दिली की आपल्याला त्यांनी (भाजपाने) काय आश्वासन दिलं होतं. सध्या मी संयम ठेवला आहे. अजून आठ-दहा दिवस संयम ठेवेन, थोडी वाट पाहणार आहे, अन्यथा मी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका दाखल करणार आहे." आनंदराव अडसूळ म्हणाले, "भाजपाने आम्हाला निवडणुकीच्या आधी दिलेला शब्द पाळला नाही आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी निवडणुकीआधी आम्हाला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे माझ्या मनात चीड निर्माण झाली आहे. या सर्व वरिष्ठ मंडळींनी दिलेलं आश्वासन पाळायला हवं होतं. शब्द देऊन ते (भाजपा) मागे फिरले आहेत. आम्ही मात्र दिलेला शब्द पाळला. मी लोकसभा निवडणूक लढलो नाही. मी ती निवडणूक लढलो असतो. पण आम्ही आश्वासन पूर्ण केलं. मी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो असतो आणि जिंकलो देखील असतो. त्यानंतर आज मी कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून दिसलो असतो. कारण माझ्या पक्षात मीच सर्वात वरिष्ठ आहे. तसेच माझ्याकडे मंत्रिपदाचा याआधीचा अनुभव देखील आहे. या सर्व गोष्टी असताना मला डावललं. याची माझ्या मनात चीड आहे. जे काही घडलं त्याबद्दल माझ्या मनात खंत का असू नये?" हे ही वाचा >> शेख हसीना पायउतार झाल्याने भारताचं मोठं नुकसान? माजी ब्रिगेडियर म्हणाले, "आपल्यासाठी हे गंभीर आहे, कारण…" .तर मला न्याय मिळू शकतो : आनंदराव अडसूळ शिंदे गटाचे नेते म्हणाले, त्यांना (भाजपा) वाटत असेल माझ्याकडे काय पर्याय आहे. तर माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाऊन क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे. सध्याची परिस्थिती पाहता मी आणखी १०-१२ दिवस वाट बघेन. या १०-१२ दिवसांत काही घडलं नाही तर माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे. मला माहिती आहे न्यायालयात कशा पद्धतीने निकाल लागतात. परंतु, माझ्या याचिकेवर सरन्यायाधीशांनी सुनावणी केली तर काही अपेक्षा ठेवायला हरकत नाही. आपल्याला न्याय मिळू शकतो